Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात 16 जणांवर अतिक्रमण विभागाची कारवाई; दंड वसूल करणार

Share
श्रीरामपुरात 16 जणांवर अतिक्रमण विभागाची कारवाई; दंड वसूल करणार, Latest News Shrirampur Encroachment Action Recovery

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने काल शहरातील मेनरोड, शिवाजी रोड तसेच संगमनेर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढले. सुमारे 16 जणांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले. मात्र ही कारवाई करताना दुजाभाव केल्याचा आरोप काही व्यावसायिकांनी केला आहे.

शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे मेनरोड, शिवाजी रोडने जाणार्‍या येणार्‍या नागरिकांसह वाहन धारकांनाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. यामध्ये सुमारे 16 जणांवर कारवाई करण्यात आली. हातगाडी चालक तसेच दुकानदारांनी समोर लावलेले बोर्ड, हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित व्यावसायिकांकडून दंड वसुल करण्यात येणार आहे.

मात्र ही कारवाई करताना काही मोठ्या व्यावसायिकांना क्लीन चिट देण्यात आली. तर छोट्या व्यावसायिकांना आपले दुकान काढायला कोणतीही वेळ न देता साहित्य उचलले असा आरोप काही व्यावसायिकांनी केला आहे.

या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगर अभियंता श्री. सरगर, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके, श्री. केदारी, श्री. दांडगे, साद शेख, पाटील आदींच्या पथकाने कामगिरी बजावली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!