Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपूरचे दोघे संशयीत पुन्हा सिव्हीलमध्ये दाखल

श्रीरामपूरचे दोघे संशयीत पुन्हा सिव्हीलमध्ये दाखल

कोरोना : केस पेपर काढून झाले होते गायब

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातून आलेले दोघे कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयात पुन्हा दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत हे दोघे मंगळवारी सायंकाळी गायब झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात येतो. या ठिकाणी मंगळवारी श्रीरामपूरचे दोघे कोरोना संशयीत आले होते. त्यांनी कोरोनाची तपासणी करावयाची सांगत त्यासाठी केस पेपर काढला.मात्र, ऐनवेळी उपस्थित डॉक्टरांना वडिलांना घेऊन येतो, असा बहाणा करत जिल्हा रुग्णालयातून काढता पाय घेतला होता.

कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेले अचानक गायब झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील आवक झाले. यानंतर त्याच रात्री ते पुन्हा दाखल झाले. परंतु रात्री उशीर झाल्याने त्यांना बुधवारी सकाळी तपासणीसाठी घेण्यात आले. ते बुधवारी दाखल झाले असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात अनेकजण तपासणीसाठी येतात, सर्वच केस पेपर काढतात, केस पेपर काढून जर संशयित गायब होत असेल, जर ते कोरोना बाधित असले तर त्यांच्या पासून अनेकांना बांधा पोहचू शकते. यामुळे डॉक्टरांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या