Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भारत बंदला श्रीरामपुरात संमिश्र प्रतिसाद

Share
भारत बंदला श्रीरामपुरात संमिश्र प्रतिसाद, Latest News Shrirampur Bharat Close Response

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बहुजन क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या भारत बंदला श्रीरामपूरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील दुकाने बंद होती. बंद पाळून शहरवासीयांनी केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीआर, सीएए या कायद्याविरोधात आपला निषेध व्यक्त केला.

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संविधान बचाव समिती, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, शीख समुदाय, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, समाजवादी पार्टी, एमआयएम, भीम आर्मी, जमियत उलेमा आदी संघटनांनी पाठिंबा दिला होता. शिवाजी रोड, संगमनेर रोड सह सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक, दशमेशनगर या भागांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. भारत बंद निमित्ताने सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध सभा घेण्यात आली.

या निषेध सभेत बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक एस. के. चौदंते, श्रीरामपूर शहर संयोजक तुषार पारखे, मुश्ताक तांबोळी, संविधान बचाव समितीचे अहमद जहागीरदार, राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना शिवाजी गांगुर्डे, शीख समुदायाचे अमरप्रीतसिंग, अशोक बागुल, नगरसेवक मुख्तार शहा, सुधाकर भोसले, दिलीप बडधे, जोएफ जामदार, एमआयएमचे साजिद मिर्झा, फिरोज पठाण, भगवान रोकडे, सुभाष तोरणे, मास्टर सरवरअली आदींनी केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्यांचा निषेध करून सदर कायदे रद्द करण्याची मागणी केली. संविधान बचाव समिती व बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरात मंगळवारी सायंकाळी फेरी काढून व्यापार्‍यांना भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

त्यास शहरवासीयांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा बंद यशस्वी करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे एस. के. चौदंते, मुश्ताक तांबोळी, तुषार पारखे, अहमद जहागीरदार, सुनील मगर, दिलीप त्रिभुवन, कॉ.जीवन सुरडे, मल्लू शिंदे, के. सी. शेळके, दिलीप बडदे, अँथोनी शेळके, संतोष मोकळ, डॉ. हमीद शेख, रियाज अन्सारी, राजेश कर्डक, अशोक शेळके, अनिल दुशिंग, राजू लोंढे, मच्छिंद्र ढोकणे, दीपक कदम आदींनी परिश्रम घेतले. श्रीरामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील व्यावसायिकही आपले व्यावसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. सकाळी शहरात बंद पाहावयास मिळाला. परंतु दुपारी अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्ववत सुरू केले होते.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!