Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना प्रतिबंधासाठी तीन दिवस श्रीगोंदा संपूर्ण लॉकडाऊन

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने 11 एप्रिल ते दि 13 एप्रिल 2020 असे 3 दिवस जनता कर्फ्यु संपूर्ण तालुक्यात जाहीर केला आहे.

या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल, खाजगी दवाखाने सुरू राहतील. अन्य अत्यावश्यक सेवा जसे किराणा, भाजीपाला, दूध, गॅस हे फक्त घरपोच सेवा देणे नेहमीप्रमाणे सुरू राहील. पेट्रोल, डिझेल अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहतील.

या कालावधीत कोणीही नागरिक अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत याची सर्वानी दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई साठी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे प्रशासनाने बजावले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!