Saturday, April 27, 2024
Homeनगरभैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी ठरला सुहास घोडके

भैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी ठरला सुहास घोडके

पाच किलोंची चांदीची गदा व 71 हजार रुपये रोख देऊन सन्मान

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या ठिकाणी शिवयुग युवा प्रतिष्ठान व पैलवान ग्रुप यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. या निकाली जगीं मैदानाचे भैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी पुणे येथील पैलवान सुहास घोडके हे ठरले असून त्यांना पाच किलोंची चांदीची गदा व 71 हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले

- Advertisement -

तालुक्यातील टाकळीकडेवळीत या ठिकाणी शिवयुग युवा प्रतिष्ठान, पैलवान ग्रुप तसेच टाकळी कडेवळीत यांच्या वतीने भैरवनाथ केशरी किताबासाठी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. त्यात पैलवान सुहास घोडके व पैलवान दादा मुलाणी कुर्डुवाडी यांच्यात लढत लावण्यात आली होती. त्यात प्रथम मानकरी पुणे येथील पैलवान सुहास घोडके यांनी पटकावला असून त्यांना 5 किलो चांदीची गदा तसेच 71 हजार रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आला तसेच दुसरी लढत ।कुंभरगाव येथील पैलवान प्रशांत जगताप आणि तालुक्यातील काष्ठी येथील पैलवान सुरेश पालवे यांच्यात जंगी लढत झाली त्यात कुंभरगाव येथील प्रशांत जगताप यांनी बाजी मारत दुसरे 51 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

त्यानंतर तिसरी लढत कर्जत येथील गणेश शेळके व अकलूज येथील श्रीनिवास मसगुडे यांच्यात झाली. यामध्ये कर्जतचे गणेश शेळके यांनी बाजी मारत 31 हजार रुपयाचे बक्षीस पटकावले आहे. तसेच चौथी लढत तालुक्यातील काष्टी येथील अण्णा गायकवाड व अकलूज येथील माउली राऊत यांच्यात झाली यामध्ये तालुक्यातील काष्टी येथील अण्णा गायकवाड यांनी बाजी मारत 31 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. पाचवी लढत टाकळीकडेवळीत गावातील पैलवान रोहित वाळुंज व माळशिरस येथील सूरज काळे यांच्यात झाली. या लढतीत गावातील पैलवान याने सूरज काळे याना चितपट करत 31 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. तसेच 6 वि लढत गावातील पैलवान राकेश नवले व पुणे येथील पैलवान अक्षय चव्हाण यांच्यात झाली.

यामध्ये राकेश नवले यांनी अक्षय तुपे यास चितपट करत 31 हजार रुपयांचे बक्षीस मिळविल. अशा एकूण तब्बल 69 कुस्त्या लावण्यात आल्या. यासाठी पंचकमिटी म्हणून संदीप नवले, आजीनाथ खामकर, भगवान खामकर, ईश्वर तोरडमल, गणेश शेळके, रोहन रंधवे, अजय रंधवे, संजय डफळ, प्रा. किरण मोरे, महेंद्र रणसिंग, राहुल पाचपुते, संदीप गायकवाड, गणेश वाघमारे, सोहेल शेख, हरी मुरकुटे, विनोद मुरकुटे यांनी पाहिले. तसेच कुस्ती निवेदक म्हणून शंकर अण्णा पुजारी व प्रशांत भागवत यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या