Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा कारखाना येथील दहा महिन्याच्या बालकाला करोना

श्रीगोंदा कारखाना येथील दहा महिन्याच्या बालकाला करोना

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- तीन दिवसांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथे घोरपडी (पुणे) येथून आलेल्या एका व्यक्तीस करोना झाला असतानाच आता तेथीलच एका दहा महन्याच्या बालकालाही करोनाची लागण झाली आहे.

श्रीगोंदा कारखाना पारिससरात एक तरुण करोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 14 जणांचे अहवाल तपासणीमध्ये निगेटिव्ह आले होते. मात्र, यातील एका 10 महिन्याच्या बाळाचा तपासणी अहवाल अनिर्णित असल्याने पुन्हा तपासण्यात आला होता. या अहवालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात त्या बालकाचा अहवाल बुधवारी करोना पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले.

- Advertisement -

दुपारी हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुलाची आई व मुलास जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. उर्वरित 12 जणांना श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात क्वारंटाईन केले आहे. बालकाला लागण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या