Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा शहरातील दारूच्या दुकानासह 15 दुकाने केली सील

श्रीगोंदा शहरातील दारूच्या दुकानासह 15 दुकाने केली सील

वाढती गर्दी ठरतेय अडचणीची; सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडला

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- श्रीगोंदा शहरातील बँका तसेच दारुच्या दुकानात सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्यामुळे तहसिलदार महेंद्र माळी यांनी नगरपालिका कर्मचारी यांना बोलावून स्वतः शहरात फिरून तब्बल 15 दुकाने बंद करून त्यांना सील केले आहेत. या कारवाईमुळे तहसिलदार माळी हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा शहरात सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडला असल्याचे चित्र निदर्शनास आल्यामुळे श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी नितीन खामकर यांच्यासह नगरपालिका कर्मचारी यांना बोलावून घेतले आणि कारवाई करण्यासाठी अचानक शहरात फिरण्यास सुरवात केली असता सुरवातीला तेली गल्लीमधील दारूचे दुकान सत्यम वाईन्स या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नव्हते त्यामुळे तहसिलदार महेंद्र माळी यांनी आदेश पारित करत सदरील दारूचे दुकान सील केल.

तसेच शहरातील एक इलेक्ट्रॉनिक दुकान, किराणा दुकान, हार्डवेअरचे दुकान, मोबाईल शॉपी, तसेच शहरातील स्वीट होम, तसेच ज्वेलरी शॉप अशी एकूण तब्बल 15 दुकाने तहसिलदार महेंद्र माळी यांनी सील केली आहेत तसेच ही कारवाई अविरत चालू राहणार असल्याची माहिती तहसिलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या