Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगाव : वाहन शोरूमला शॉर्टसर्कीटने आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोपरगाव : वाहन शोरूमला शॉर्टसर्कीटने आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) –  शहरातील येवला रोड परिसरातील श्रद्धा होंडा शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

शहरतील मध्यवस्तीत असलेल्या येवला रोड परिसरात होंडा कंपनीचे श्रद्धा होंडा शोरूम असून रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोटारसायकल विक्रीस असलेल्या शोरुमच्या सर्व्हिसिंग विभागात अचानक आगीसह धुराचे लोळ स्थानिक नागरिकांना दिसले. शोरुममधील सोलर पॅनल, ऑईलचे डबे, फायबरचे साहित्य, मोटारसायकलीसह इतर साहित्यांना आग लागल्याने आगीचा भडका होत होता. शोरुमच्या शेजारी नागरी वसाहत असल्याने सर्वांची पळापळ सुरू झाली. नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती कळविली.

- Advertisement -

नगर परिषद अग्निशामक दलाचे संभाजी कार्ले, कार्तिक मालकर, संजय विधाते, चेतन गव्हाणे, प्रशांत शिंदे आदींनी दोन अग्निशामक बंब घेऊन घटनास्थळी धाव घेत एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणून पुढील होणारी दुर्घटना टळली आहे.

या आगीत शोरूमधील लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शोरूमचे मालक विशाल व अशोक सरोदे यांनी दिली. यावेळी नगरसेवक जनार्धन कदम, गिरमे वैभव, अनिरुद्ध काळे आदींसह अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1594701944012609&id=623727067776773

- Advertisment -

ताज्या बातम्या