Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेनेच्या नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

Share
संगमनेरात 1100 किलो गोमांस जप्त, Latest News Sangmner Crime News

महिलेस बंदुकीचा धाक दाखवून धमकावले

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या एका नगरसेवकासह पाच ते सहा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची व शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याची फिर्याद नालेगावच्या झारेकर गल्लीतील महिलेने दिली आहे. त्यावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे, सुरज सिंदुपटला, सुरज शिंदे, गणेश चव्हाण, समीर शेख व इतर दोन-तीन अनोळखी इसम (सर्व रा.झारेकर गल्ली, नालेगाव) यांचा समावेश आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास आणि सोमवारी (दि. 2) रात्री अडीचच्या सुमारास आरोपींनी वाहनातून घरी येऊन बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबास शिवीगाळ करत दमदाटी केली. यातील महेश चव्हाण व समीर शेख यांनी घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन केल्याचेही या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 141, 143, 354, 452, 427, 323, 504, 506 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार बी. डी. शिंदे करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!