Thursday, April 25, 2024
Homeनगरबिबट्याच्या बछड्याला लागला मुलांचा लळा; उक्कलगावात सापडले बिबट्याचे दोन बछडे

बिबट्याच्या बछड्याला लागला मुलांचा लळा; उक्कलगावात सापडले बिबट्याचे दोन बछडे

रुई येथील मुलांबरोबर खेळणे, बागडणे झाले नित्याचेच

शिर्डी (प्रतिनिधी) – बिबट्या किंवा बिबट्याचे पिल्लू दिसले तरी लोकानची त्रेधातिरपट होते. पळ काढतात परंतु राहाता तालुयातील शिर्डी-शिंगवे रस्त्यावरील रुई येथील एका वस्तीवर बिबट्याचे एक पिलू दरररोज येत असल्यामुळे त्यास माणसाचा लळा लागला. ते पिलू वस्तीवर येऊन खेळू लागले आणि या परिसरातील मुलांनाही या बिबट्याच्या पिलाचा लळा लागला आहे. आणि त्याला पिलाला पे्रेमाने बग्गी म्हणत असतात आणि नाव उच्चारताच ते पिलू त्या मुलांकडे धावत जात असते.

- Advertisement -

जंगलबुकमधील मोगली आणि बघिराच्या गोष्टीनुसार अशीच काहीशी मिळती जुळती सत्य परिस्थिती अहमदनगर जिल्ह्याच्या रुई गावात दिसून येत आहे. शेती पिकात लपण्यासाठी जागा आणि उपलब्ध होणारे खाद्य यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठी झाली आहे. शेतात बिबटे आपल्या पूर्ण परिवारासह फिरतात.

अशाच एका बिबट्याच्या पिल्लाचा लळा तीन मुलांना लागला आहे. शिर्डी शिंगवे रोड वरील वस्तीवर बिबट्याचे एक पिल्लू दररोज येत असते. सुरुवातीला या पिल्लाची भिीती वाटली. या पिलाच्या आसपास तिची आई आली आणि तिने हल्ला केला तर या भीतीने या भागातील नागरिक व लहान मुले सुरुवातीला कोणीही जात नव्हते. मात्र हे पिल्लू दररोज घराजवळ येऊन खेळू लागल्याने आता सगळ्यांना त्याची सवय झाली आहे. या पिल्ला बरोबर दिवसा त्याची आई नसते. पिल्लाचा वावर आता सामान्य झाल्याने वस्ती वरील मुलांनाही त्याचा लळा लागला आहे.

जंगल बुक मोगलीतील काळ्या चित्याप्रमाणेच त्याचा वावर असल्याने या मुलांनी बघीरा म्हणून त्याच नावही ठेवलय…प्रेमाने ते त्याला बग्गी देखील म्हणतात….शाळेत जाण्या आधी त्याला कुरवाळूनच ही मुले जातात. शाळेतही त्यांना या बघिराची चिंता असते. घरी आल्या नंतर ही मुले त्याच्या बरोबर खेळतात, बागडतात. बिबट्याचे पिलू बघिरा आपल्या शेतात वस्तीवर मुक्त वावरु दिलेय. बिबट्या हा तसा हिंस्रप्राणी याची कल्पना या मुलांना असली तरी त्यांच बालमन आणि बिबट्याच्या पिल्ल्याचे अल्लड वागणे हे जमून आले. आज न उद्या हे पिल्लू जाईन म्हटले की मुलांचे डोळे पाणवतात. या पिलाचा या मुलांना इतका लळा लागला की, त्याला त्याला सोडणे खूपच अवघड जाणार आहे.

उक्कलगावात सापडले बिबट्याचे दोन बछडे

चांडेवाडीत बिबट्याची पिंजर्‍याला हुलकावणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील गळनिंब, उक्कलगाव, चांडेवाडी, ममदापूर, मांडवे, कडीत, फत्याबाद, कुरणपूर या प्रवरा नदीपात्रातील शेजारील गावांमध्ये गेल्या महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट रस्त्यावर भारत जगधने यांच्या उसाच्या शेतात काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

दोन बछडे आढळून आल्याने धनवाट परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याचे बछडे असल्याची माहिती कळताच कोपरगावचे वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांच्या सह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. सापडलेले हे बछडे एक किंवा दोन महिन्यांचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धनवाट ओढ्या शेजारील भागात नागरिकांनी बछड्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. बछडे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

धनवाट परिसरातील शेतकरी अशोक जगन्नाथ थोरात यांच्या वस्तीवर बिबट्याने काल रात्रीच कुत्र्यांवर आणि रान बोक्याचा फडशा पडला. भारत जगधने यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असल्यामुळे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी नजीकच नवीन पिंजरा बसविण्यात आला असून त्यातील बिबट्याचे बछडे ठेवण्यात आले आहेत. वनसंरक्षक भोसले, पवार, दक्षता पथकासह अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पिंजरा लावण्यात आला. वनविभागाचे अधिकारी, वनपाल, दक्षता पथकाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

चांडेवाडीत नवीन पिंजरा
श्रीरामपूर तालुक्यासह परिसरात, 12 पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यातील गळनिंब येथे सहा ते सात पिंजरे लावण्यात आले आहेत. काही पिंजरे मांडवे, फत्याबाद शिवारात लावण्यात आले आहेत. चांडेवाडी शिवारात नवीन पिंजरे लावण्यात आले असून एका पिंजर्‍यापासून बिबट्या रात्री अलगदपणे माघारी परतला. त्याने पिंजर्‍यास हुलकावणी दिल्याचे सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने वन कर्मचार्‍यांना माहिती दिली. वन अधिकार्‍यांनी पाहणी करत तातडीने नवीन पिंजरा लावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या