Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डीतील रंगपंचमीवर कोरोनाचे सावट

शिर्डीतील रंगपंचमीवर कोरोनाचे सावट

साईबाबांच्या रथ मिरवणुकीस मात्र गर्दी

शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून साईभक्त येत असतात. सध्या कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्यामुळे याचा परिणाम शिर्डी शहरातील रंगपंचमीवर दिसून आला. मात्र रंगपंचमीनिमित्त साई संस्थानमार्फत काढण्यात आलेल्या साईबाबा पालखी मिरवणुकीत तरुणांनी जल्लोष करुन रंगाची उधळण केली होती.

- Advertisement -

शिर्डी शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र मागील महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळे गर्दी करुन एकत्र येऊ नये असे निर्देश आल्यामुळे अनेकजण कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर पडण्यासही घाबरत असतात. त्यामुळे काल रंगपंचमीचा उत्सव असतानाही कोणी बाहेर पडत नव्हते. व रंगपंचमी सणाचा आनंद घेत नव्हते. शहरातील महत्वाच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जात होती. व्यावसायिकही या रंगपंचमीनिमित्त आपली दुकाने बंद करुन सहभागी होत असे. मात्र काल रंगपंचमी असतानाही शहरातील दुकाने उघडी होती.

कुणीही रंगपंचमीत सहभागी न होता आपला व्यवसाय करत होती. मात्र काल साई संस्थानच्या वतीने रंगपंचमीनिमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक साईभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मंदिरापासून या पालखीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. साई पालखीपुढे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी केली. तसेच वाद्याच्या तालात तरुणांनी ठेका धरत नाचण्यागाण्याचा आनंद घेत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. या रथ मिरवणुकीत कोरोनाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. रस्त्यारस्त्यातून भाविक या रथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या