Type to search

Featured नाशिक

शिर्डीची विमानसेवा खराब वातावरणामुळे बंद; नाशिक विमानतळाचा वापर न केल्याने उपेक्षेची भावना

Share

सातपूर । प्रतिनिधी

खराब वातावरणामुळे आज शुक्रवार पासून शिर्डी विमानतळावरुन टेक ऑफ रद्द करण्यात आल्याने प्रवाश्यांचे फार हाल होत आहेत. या बाबत एविएशन विभागाने नाशिक विमानतळाला सक्षम करुन त्याचा वापर तातडीने करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी नाशिक एविएशन संघटनेद्वारे करण्यात येत आहे. शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवारपासून टेकऑफ रद्द करण्यात आल्याचे संचालक दीपक शात्री यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, देश विदेशातील साई भक्त शिर्डीत या सेवेतील खंडनामुळे ताटकळले आहेत. सध्या शिर्डी विमानळावरून मुंबई, इंदोर, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, जयपुर आदी शहरांतून दिवसभरात 28 विमानांचे टेकऑफ व लँडिंग होत असते. गुरूवारी सकाळपासूनच खराब व ढगाळ वातावरणामुळे विमान उतरण्यासाठी आवश्यक दृष्यमानता (व्हिजिबिलिटी) मिळत नसल्याने स्पाईस जेट, इंडियन एयरलाइंस, इंडिगो आदी विमान कंपन्यांनी सर्व विमानाची शिर्डीतील टेकऑफ व लँडिंग रद्द केली. रात्री उशीरापर्यंत शिर्डीत प्रचंड खराब व ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी परिस्थिती सुधारली नाही, तर आजचीही सर्व विमाने रद्द करण्यात आली आहे.

शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी आहे. गुरुवारी अचानक विमानाचे लँडिंग व टेकऑफ रद्द झाल्याने अनेक साईभक्तांना ताटकळत राहून मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून शिर्डीला विमानाने आलेल्या साईभक्तांना गुरुवारी खराब हवामानाचा फटका बसलाअसून, ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता नसल्याने स्पाइसजेटच्या 3 विमानांनी 15 ते 20 मिनिटे हवेत घिरट्या घातल्या.

नाशिकला दूय्यम स्थान

नाशिक विमानतळावर सर्व सूविधा उपलब्ध असताना त्याला मुंबईचा पर्योय म्हणून पाहीले जात होते. मात्र शिर्डीची विमाने औरहगाबादला पाठवण्यासोबतच दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना नाशिकच्या एवीएशन समितीद्वारे व्यक्त करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!