Wednesday, April 24, 2024
Homeनगरशनिजयंती उत्सवात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग

शनिजयंती उत्सवात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग

चौकशी करून गुन्हा दाखल करा; देवस्थान उपाध्यक्षांची मागणी

शनीशिंगणापूर (वार्ताहर)- येथील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीजयंती उत्सव करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा असे लेखी पत्र देवस्थान प्रशासनाला दिले गेले होते. मात्र 25 ते 30 नागरिक उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचा भंग करण्यात आल्याचा आरोप देवस्थानच्या उपाध्यक्षांनी केला असून याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे.

- Advertisement -

शनीशिंगापूर येथे दोन दिवसांपूर्वी शनिजयंती उत्सव पार पडला. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर पोलीस प्रशासनाने घाईघाईने शनिजयंती दिवशी 11 वाजता करोना संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून पाच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी परंपरेनुसार साजरा करावा,असे लेखी पत्र देवस्थान प्रशासनला दिले. त्यात नियमाचे उल्लंघन झाल्यास कलम 144 नुसार गुन्हे दाखल होतील असे नमूद करण्यात आले होते.

परंतु देवस्थान मंदिर परिसरात 25/30 नागरिकांनी मोठी गर्दी करून सोशल डिस्टन्स न पाळता कलम 144 कायदयाचा भंग केल्याचा आरोप करुन याबाबत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी मागणी देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ. रावसाहेब बानकर, व शालिनीताई लांडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्याकडे केली आहे.

आरतीला रेड झोनमधील अधिकारी
शनिजयंती निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी आरतीला उपस्थित होते. त्यांना कोणी व कसे आणले? ते कोण आहे? याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा.
– शालिनीताई लांडे विश्वस्त शनैश्वर देवस्थान

- Advertisment -

ताज्या बातम्या