Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शनिशिंगणापूर येथील दर्शन, धार्मिक कार्यक्रम रद्द

Share
शनिशिंगणापूर येथील दर्शन, धार्मिक कार्यक्रम रद्द Latest News Shani Temple Close Corona Shanishingnapur Newsa

नेवासा – तालुक्यातील शनैश्‍वर देवस्थान शनिशिंगणापूर येथील दर्शन तसेच धार्मिक कार्यक्रम करोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आले आहेत. याबाबत संस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी साडेसहाच्या आरती पासून संस्थांचे भक्तनिवास प्रसादालय व शनिदेवाचे दर्शन पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवलेले आहेत तसेच 20 मार्च एकादशीच्या दिवशीची कीर्तन सेवा व 25 मार्च ला होणारी गुढीपाडवा यात्रा तसेच उदासी महाराज सप्ताह रद्द करण्यात आलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!