Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला

Share

मुंबई | वृत्तसंस्था

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे मंगळवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी खाली आला आहे. देशाच्या शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यापारात मंगळवार सकाळपासूनच घसरण दिसून आली आहे.

सेन्सेक्सची जोरदार सुरुवात झाली होती परंतु काही मिनिटांच्या व्यापारानंतर तो घसरत चालला होता. त्याचबरोबर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण पहावयास मिळाली आहे.

सकाळी 9.51 वाजता सेन्सेक्स 124.13 अंकांनी घसरुन 36,999.18 वर व्यापार सुरु होता. निफ्टी देखील यावेळी सुमारे 41.75 अंकांच्या कमजोरीसह 10,961.75 वर व्यापार करताना दिसला.

मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 46.15 अंकांनी वाढून, 37,169.46 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 3.4 अंकांच्या किंचित कमजोरीसह 11,000.10 वर उघडला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!