Type to search

माध्यमिक सोसायटीची निवडणूक 90 शिक्षक रिंगणात

Share
शिक्षक संघटनांचे अधिवेशन केवळ दीर्घ सुट्टीत, Latest News Teacher Convention Associations Holidays Sangmner

अहमदनगर (वार्ताहर)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी तब्बल 90 शिक्षक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पुरोगामी सहकार व विरोधी परिवर्तन आघाडी यांच्यातच खरी लढत होणार असून जनसेवा बहुजन आघाडीचा लंगडा पॅनेल झाला आहे. मात्र तो पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

10 हजार 203 मतदार असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटी संचालक पदाच्या 21 जागांसाठी 340 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 17 अर्ज बाद झाले. अर्ज माघारीसाठी काल शेवटच्या दिवशी 90 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता निवडणूक रिंगणात 90 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यात सर्वसाधारण जागांसाठी 70 अर्ज, महिला राखीव साठी 7, ओबीसीसाठी 3, अनुसूचित जातीजमातीसाठी 5, तर भटक्या विमुक्त साठी 5 अर्ज शिल्लक राहिले आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सहकार व विरोधी परिवर्तन आघाडी यांच्यातच लढत असून दोन्ही आघाडीच्या विरोधात दंड थोपटलेल्या तिसर्‍या जनसेवा बहुजन आघाडीला 21 जागांपैकी केवळ 8 जागांवरच उमेदवार देता आले आहेत. दोतही गटांनी जोरदार तयारी केली असल्याने चुरस वाढणार आहे.

आज 29 जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत असून त्यानंतर चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान 9 फेब्रुवारी रोजी तालुकानिहाय घेण्यात येणार आहे. मतमोजणी 10 रोजी एकत्रीत करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.आर.रत्नाळे काम पाहत असून त्यांना सुनील बनसोडे व अल्ताफ शेख सहकार्य करीत आहेत.

पुरोगामी आघाडीचे उमेदवार – सर्वसाधारण -भाऊसाहेब कचरे, धनंजय म्हस्के, सुर्यकांत डावखर, ज्ञानेश्वर काळे, अण्णासाहेब ढगे,अनिल गायकर, सत्यवान थोरे, सुरेश मिसाळ, संजय कोळसे, दिलीप काटे, काकासाहेब घुले, बाळासाहेब सोनवणे, नंदकुमार दिघे, अशोक ठुबे, कैलास राहणे, चांगदेव खेमनर.

अनुसूचित – धोंडीबा राक्षे , भटक्या विमुक्त -दिलावर फकीर, ओबीसी-अजित वडावकर, महिला राखीव -आशा कराळे, मनीषा म्हस्के
परिवतर्न आघाडीचे उमेदवार : सर्वसाधारण -आप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडखे,अंबादास राजळे,भीमाशंकर तोरमल,राजेंद्र गवांदे,उमेश गुंजाळ,दिलीप डोंगरे, रामनाथ शेळके, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब पवार,सुनील दानवे,शशिकांत काकडे,अरविंद देशमुख,शिरीष टेकाडे,भगवान राऊत,नंदकुमार शितोळे.

महिला – ज्योति वारुळे, जान्हवी गाडगे, ओबीसी-महेंद्र हिंगे, अनुसूचित जाती-बाजीराव जाधव, भटक्या विमुक्त-वसंत खेडकर.
एकच चिन्ह द्या. स्वाभीमानी परिवर्तन मंडळाच्या सर्व उमेदवारांना एकच ‘कपबशी’हे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी पॅनलच्या वतीने मारूती लांडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे त्यांची मागणी मान्य होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

9 संचालक पुन्हा रिंगणात
सत्ताधारी पुरोगामी सहकार आघाडीच्यावतीने 16 पैकी केवळ 6 विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.तर विरोधी परिवर्तन आघाडीने त्यांच्या विद्यमान 5 संचालकांपैकी 3 संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आहे. दोन्ही पॅनेलकडून नव्या चेहर्‍यांना संधी देण्यासाठी 12 विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे नाराज संचालक कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!