Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजनधनचा दुसरा हप्ता उद्यापासून

जनधनचा दुसरा हप्ता उद्यापासून

दिल्ली – महिलांच्या जनधन बँक खात्यांत 500 रुपयांचा दुसरा हप्ता उद्यापासून ( ४ मे) जमा होणार आहे. करोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता आणि गरिबांना आर्थिक मदत करण्यासाठी महिला जनधन खात्यात दर महिन्याला 500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्च रोजी केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात 500 रुपयांचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. एप्रिलपासून सलग तीन महिने या खात्यांमध्ये प्रत्येकी 500 रुपये जमा होणार आहेत.

मे महिन्याची रक्कम सरकारतर्फे पाठविण्यात आली असून, सोमवारपासून ती खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. योजनेतील लाभार्थी महिलांनी आपल्या बँकेत याबाबत चौकशी करावी. प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा एटीएमद्वारेही ही रक्कम काढता येणार आहे, अशी माहिती वित्त सचिव देबाशिश पांडा यांनी ट्विटरवर दिली. पैसे काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, ही रक्कम पाच ते सात दिवसांच्या काळात खात्यांमध्ये जमा होणार आहे. यामुळे भौतिक दूरता नियमाचे पालन करणे सर्वांना शक्य होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या