Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शालेय पोषण आहारात कोट्यवधीचा ‘गफला’

Share
शालेय पोषण आहारात कोट्यवधीचा ‘गफला’, Latest News School Nutrition Diet Froud Ahmednagar

जालींदर वाकचौरे : सुट्ट्यांच्या काळात दूध, अंडी, फळांसह तांदुळावर ताव कोणाचा ?

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या शालेय पोषण आहार योजनेत एप्रिल ते मे 2019 या सुट्ट्यांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा गफला झाला आहे. विशेष म्हणजे या दोन महिन्यांत प्राथमिक शाळांना सुट्ट्या असताना प्राथमिक शिक्षक विभागाने अंडी, दूध आणि फळांच्या पुरवठ्यापोटी 2 कोटी 52 लाख 44 हजारांचा निधी बंधीत पुरवठादाराला अदा केलेले असल्याचा आरोप जिल्हा परिषद गटनेते तथा जालींदर वाकचौरे यांनी केला आहे.

यासह दर महिन्याला नियमित पुरवठा होणार्‍या तांदुळाचे 2 कोटी 57 हजार रुपयांचे देयक शिक्षण विभागाने खात्री न करता परस्पर अदा केले असल्याने यात देखील मोठा आर्थिक गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना सदस्य वाकचौरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून घेतलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत प्राथमिक शाळांना सुट्या असते. याच काळात शिक्षण विभागाने पोषण आहार पुरवठा करणार्‍या संबंधीत ठेकेदारलाशी संगमत करून पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांच्या आहारावर ताव मारण्याचे काम केलेले आहे. सरकारने उदात्त हेतून प्राथमिक शाळेत येणार्‍या 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वीपर्यंत सरकारी आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना पूरक आणि पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, योजना राबवितांना पुरवठादार आणि शिक्षण विभाग ताव मारल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील पोषण आहार योजनेसंदर्भात यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. एप्रिल ते मे 2019 या सुट्टट्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्ट्या असतांना शिक्षण विभागाने या काळात पुरवठा केलेल्या केळी, अंडी आणि फळांच्या बिलापोटील 2 कोटी 52 लाख 44 हजार रुपये संबंधीत ठेकेदाराला अदा केलेले आहेत. यासह जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान तांदूळाच्या पुरवठापोटी संबंधीत पुरवठादार याच्या घशात 2 कोटी 57 लाख 94 हजार रुपयांची रक्कम घातली आहे. ही रक्कम अदा करतांना संबंधीत पुरवठादार यांने पाठविलेला तांदूळ, त्याचा दर्जा, त्याचे वजन यांची खातजमा शिक्षण विभागाने केली नाही, याचा तपशील मात्र मिळत नाही. यामुळे अदा करण्यात आलेली रक्कमेबाबत संशयाचेकडे तयार झालेले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात पोषण आहाराबाबत अनेकवेळा तक्रारी झालेला आहेत. मात्र, शिक्षण विभागाने पोषण आहार योजना आणि संबंधीत पुरवठादार यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईची माहिती कोणाच्या ऐकिवात नाही. जर संबंधीत विभागच पुरवठादार याला अभय देत असले तर दोषी कोणाला धराचे असा प्रश्‍न सदस्य वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिनिधीक स्वरूपातील तांदूळाचे देयक
जून 2019 मध्ये 4 लाख 32 हजार 409 लाभार्थ्यांचे 21 लाख 62 हजार 45 रुपये, जुलै 2019 मध्ये 21 लाख 87 हजार 373 लाभार्थ्यांचे 1 कोटी 9 लाख 36 हजार रुपये, ऑगस्ट 2019 मध्ये 1 लाख 71 हजार 4 हजार लाभार्थ्यांचे 85 लाख 70 हजार 195 रुपये, सप्टेंबर 2019 मध्ये 8 लाख 25 हजार 174 लाभार्थी 41 लाख 25 हजार 870 रुपये असे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!