Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोना – शाळा, महाविद्यालयांसाठी एचआरडीची नियमावली

करोना – शाळा, महाविद्यालयांसाठी एचआरडीची नियमावली

नवी दिल्ली – शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक अंतराची नियमावली मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (एचआरडी) तयार केली जात आहे.

करोनाचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 16 मार्चपासून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर 24 मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी घोषित करण्यात आली आणि त्याला 17 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतराबाबतची नियमावली तयार केली जात आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळांसाठी तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शत तत्त्वे तयार केली जात आहेत.

- Advertisement -

विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यांपासून सुरू करण्याची यापूर्वीच शिफारस केली आहे तर विविध माध्यमांच्यावतीने शाळांनीही शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या