Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सार्वमत शॉपिंग एक्स्पोमुळे श्रीरामपूरच्या बाजारपेठेला मिळणार चालना

Share
सार्वमत शॉपिंग एक्स्पोमुळे श्रीरामपूरच्या बाजारपेठेला मिळणार चालना, Latest News Sarvmat Shopping Expo Market Shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दै. सार्वमतच्या वतीने आज दि. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालवधीत ‘सार्वमत शॉपिंग महोत्सव 2020’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्राहकांना खरेदीबरोबरच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार असून या जोडीला मनोरंजनाचा खजिनाही ग्राहकांना लुटता येणार आहे.

येथील थत्ते मैदानावर आजपासून सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चार दिवस या महोत्सवात ग्राहकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. या महोत्सवाचे प्रायोजक समता नागरी सहकारी पतसंस्था असून सहप्रायोजक महर्षी नागरी सहकारी पतसंस्था, चंदूकाका ज्वेलर्स, साई आदर्श मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटी आणि डी.एम. मुळे चष्मावाला हे आहेत.

श्रीरामपूरमध्ये दैनिक सार्वमत प्रथमच सार्वमत शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करत असून यामध्ये अगदी छोट्या वस्तूपासून मोठ्या टू-व्हिलर, फोर व्हिलर गाड्या तसेच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा अस्वादही घेता येणार आहे. याबरोबरच विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम व स्पर्धाही याठिकाणी होणार आहे.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये नागेबाबा मल्टिस्टेट, साई निर्माण उद्योगसमूह, श्रीसाई टायर्स अ‍ॅण्ड ट्रॅक्टर्स, शिरोडे ह्युंडाई, योगिराज फर्निचर, पिपाडा मोटर्स, किसान कार्पोरेशन, भनसाळी टिव्हीएस, पॉपकॉर्न मेकर, ज्युसर, नागली फिंगर्स, रोहित मार्केटिंग, अविनाश सेल्स टॉवर फॅन, डि. एम. मुळे चष्मावाला, संस्कार मसाले, मोहमद किचन वेअर, वीर फिटनेस, मुस्ताक किचनवेअर, गॅस जाळी, प्रिन्स पेस्ट कंट्रोल, हरे रामा, हरे कृष्णा, अन्सारी टीव्ही कव्हर्स, राजू स्टोन ज्वेलरी, अम्बीकॉन ऑईल मशिन, दासणी लेडीज फूटवेअर, अली कार्पेट, पारस पापड, धरतीमाता नॉव्हेल्टी स्टोअर्स, द्वारकेश फार्मा, एस. ए, ग्रुप रोटी मेकर, गुजराथी नमकीन, गौरव मार्केटिंग, प्रथमेश मार्केटिंग, तिरुपती सेल्स, किरण बेकर्स, वरद हर्बल, रामेश्वर इंडस्ट्रीज, खादी शर्ट, कॉटन सॉक्स आदी व्यावसायिक सहभागी आहेत.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये ग्राहकांना खरेदीसाठी गॅस स्टोव्ह, फिटनेस साहित्य, पेस्ट कंट्रोल, नागली फिंगर्स, पॉपकॉर्न मेकर, फर्निचर, पिकनिक टेबल, हॉट बॅग, शिलाई मशिन, चप्पल, बूट, नमकीन, विविध प्रकारचे साबण, रोटी मेकर, खादी शर्ट, कॉटन शॉक्स, विविध प्रकारचे औषधे, टू-व्हिलर, फोर व्हिलर, गॅस जाळी, विविध प्रकारचे मसाले, किचन वेअर, हळदी प्रॉडट्क्स्, प्लॉट व फ्लॅट, चिक्की व गुळपट्टी, हर्बल, ट्रॅक्टर, जवस, हिंगोळी, मॅजिक बुक, मणुके, लेग मसाजर्स, ऑईल मेकिंग मशिन, नोट काउंटींग मशीन, ग्लास क्लिनर, धूप स्टँड, नागली पापड, फॅन्स, खुर्च्या, खाकरा, सोयास्टिक, उडीद पापड, कुर्डई, चुर्णमुखवास, बल्ब, सेव्हर, भेंडी कटर, स्लाईसर, ज्युसर, आयमास्क, आयुर्वेदीक औषधे, मिल्क शेक पावडर, कॉटन सारीज, खानदेशी उडीद पापड, हेअर ड्रायर, वेदनाशामक ऑईल, गुलाबजल, जडीबुटी, कॉस्मेटीक्स, आटामेकर, हँगिग झुला आदी वस्तूंबरोबरच भरीत भाकरी, पुरणपोळी मांडे, फ्रुट चाट, शेगाव कचोरी, दिल्ली पापड, मसाला पान, वडापाव, दाबेली, धपाटे, पाणीपुरी यासह विविध प्रकारचे खाद्यप्रदार्थ ग्राहकांना याठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

खरेदीबरोबरच ग्राहकांसाठी मनोरंजनाचा खजाना
गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. श्रीरामपूर डान्स आयडॉल, भव्य सोलो डान्स स्पर्धा, शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. श्रीरामपूर डान्स आयडॉल ग्रुप डान्स स्पर्धा, शनिवार दि. 29 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. आर्केस्ट्रा बॉलीवूड धमाका आणि रविवार दि. 1 मार्च रोजी सायं. 5 वा. रंग लावण्यांचे आजरामर मराठी-हिंदी चित्रपट गिते आणि लावणीचा धुमधडाका.

खवय्यांसाठी खास आकर्षण
जळगावचे वांगी-भरीत व भाकरी, खांदेशचे मांडे, जळगावची मिसळ, नाशिकची चटकदार भेळ, मालेगावचे चाट मसाले आणि जोडीला श्रीरामपूरचे धपाटे, आईस्क्रीम

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!