Thursday, April 25, 2024
Homeनगररेकॉर्ड ब्रेक गर्दीने सार्वमत एक्स्पो ची शानदार सांगता

रेकॉर्ड ब्रेक गर्दीने सार्वमत एक्स्पो ची शानदार सांगता

बहारदार लावण्यांनी श्रीरामपूरकर तृप्त ; सार्वमतच्या उपक्रमाचे ग्राहकांकडून कौतुक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि ठसकेबाज लावण्या, श्रीरामपूरकरांच्या स्मरणात राहील अशा शानदार सोहळ्यात काल सायंकाळी 10 वाजता दैनिक सार्वमत आयोजित ‘सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020’ ची सांगता झाली. श्रीरामपूरकारांसाठी हा खरेदी महोत्सव अभूतपूर्व ठरला. अनेकांनी ’सार्वमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

- Advertisement -

या खरेदी महोत्सवाच्या काल शेवटच्या दिवशी ‘रंग लावण्यांचे’ या कार्यक्रमात लावणीचा धुमधडाका असल्याने तोबा गर्दी झाली.

दै. सार्वमत आयोजित ‘सार्वमत शॉपिंग महोत्सव 2020’ गेल्या चार दिवसांपासून येथील थत्ते मैदानावर सुरू होता. पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. या महोत्सवात नागरिकांनी खरेदीबरोबरच वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची चव चाखली तर त्या जोडीला मनोरंजनाचाही खजिना लुटला. त्यामुळे या कार्यक्रमास गर्दीचा महापूर ओसंडत होता.

गेली चार दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सार्वमत शॉपिंग महोत्सवातून श्रीरामपूरसह जिल्हाभरातील ग्राहकांना सर्व गोेष्टी एकाच छताखाली मिळाल्या. आजच्या धावपळीच्या युगात खरेदीबरोबरच मनोरंजन असे सर्व काही एकाच ठिकाणी अन् शांतता व उत्साहाच्या वातावरणात मिळाल्याने ‘सार्वमत’च्या उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव झाला.

या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक समता नागरी सहकारी पतसंस्था तर सहप्रायोजक महर्षी नागरी सहकारी पतसंस्था, चंदूकाका ज्वेलर्स, साई आदर्श मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी आणि डी. एम. मुळे चष्मावाला हे होते.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये नागेबाबा मल्टीस्टेट, साई निर्माण उद्योगसमूह, श्री साई टायर्स अ‍ॅण्ड ट्रॅक्टर्स, शिरोडे ह्युंडाई, योगिराज फर्निचर, पिपाडा मोटर्स, किसान कार्पोरेशन, भनसाळी टिव्हीएस, पॉपकॉर्न मेकर, ज्युसर, नागली फिंगर्स, रोहित मार्केटिंग, अविनाश सेल्स टॉवर फॅन, डि. एम. मुळे चष्मावाला, संस्कार मासले, मोहमंद किचन वेअर, विर फिटनेस, मुस्ताक किचनवेअर, गॅस जाळी, प्रिंन्स पेस्ट कंट्रोल, हरे रामा, हरे कृष्णा, अन्सारी टीव्ही कव्हर्स, राजू स्टोन ज्वेलरी, अम्बीकॉन ऑईल मशिन, दासणी लेडीज फूटवेअर, अली कार्पेट, पारस पापड, धरतीमाता नॉव्हेल्टी स्टोअर्स, द्वारकेश फार्मा, एस. ए. ग्रुप रोटीमेकर, गुजराथी नमकीन, गौरव मार्केटिंग, प्रथमेश मार्केटिंग, तिरुपती सेल्स, किरण बेकर्स, वरद हर्बल, रामेश्वर इंडस्ट्रीज, खादी शर्ट, कॉटन सॉक्स आदी व्यावसायिक सहभागी झाले होते.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये ग्राहकांना खरेदीसाठी गॅस स्टोह, फिटनेस साहित्य, पेस्ट कंट्रोल, नागली फिंगर्स, पॉपकॉर्न मेकर, फर्निचर, पिकनिक टेबल, हॉट बॅग, शिलाई मशिन, चप्पल, बुट, नमकीन, विविध प्रकारचे साबण, रोटी मेकर, खादी शर्ट, कॉटन शॉक्स, विविध प्रकारचे औषधे, टु-व्हिलर, फोर व्हिलर, गॅस जाळी, विविध प्रकारचे मसाले, किचन वेअर, हळदी प्रॉडट्क्स्, प्लॉट व फ्लॅट,

चिक्की व गुळपट्टी, हर्बल, ट्रॅक्टर, जवस, हिंगोळी, मॅजिक बुक, मणुके, लेग मसाजर्स, ऑईल मेकिंग मशिन, नोट कांऊटींग मशीन, ग्लास क्लिनर, धुप स्टँड, नागली पापड, फॅन्स, खुर्च्या, खाकरा, सोयास्टिक, उडीद पापड, कुरडई, चुर्णमुखवास, बल्ब, सेव्हर, भेंडी कटर, स्लाईसर, ज्युसर, आयमास्क, आयुवेर्दीक औषधे, मिल्क शेक पावडर, कॉटन सारीज, खानदेशी उडीद पापड, हेअर ड्रायर, वेदनाशामक ऑईल, गुलाबजल, जडीबुडी, कॉस्मेटीक्स, आटामेकर, हँगिग झुला आदी वस्तूच्या खरेदी बरोबरच भरीत भाकरी, पुरणपोळी मांडे, फ्रुट चाट, शेगाव कचोरी, दिल्ली पापड, मसाला पान, वडापाव, दाबेली, धपाटे, पाणीपुरी यासह विविध प्रकारचे खाद्यप्रदार्थाची चव ग्राहकांना चाखायला मिळाली.

या खरेदी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रवेशाद्वारावर खुशी पिंकी शेख हिने ‘सुस्वागतम’ची आकर्षक रांगोळी रेखाटली होती. तर दोन दिवसांच्या नृत्य स्पर्धेचे उत्तमप्रकारे अ‍ॅन्करिंग प्रा. आदिनाथ जोशी यांनी केले. शेवटी मुळे मोटर्सचे पुरूषोत्तम मुळे व अभिजीत मुळे यांनी श्रीरामपूर शॉपिंग एक्स्पो 2020 चे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल ‘सार्वमत’ टिमला धन्यवाद देऊन श्रीरामपूकरांच्यावतीने सर्वांचा सत्कार केला. कुर्‍हे टेंड हाऊसचे विजय कुर्‍हे यांचा अतिशय उत्तम प्रकारे सेवा दिल्याबद्दल दैनिक सार्वमतच्यावतीने गौरव करण्यात आला.

कारवा ठरले एल.ई.डी. विजेते
या खरेदी महोत्सवाच्या काळात सार्वमतच्यावतीने ग्राहकांसाठी ‘भाग्यवान विजेता’ ही अनोखी भेट दिली. यात दरोराज शॉपिंग एक्स्पोला भेट देणार्‍या ग्राहकांकडून कुपन भरुन घेवून त्यातून दररोज दहा भाग्यवान ग्राहकांची निवड करण्यात आली. त्यांना सार्वमतच्यावतीने गिप्ट बॉक्स देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या त्यानंतर काल शेवटच्या दिवशी या कुपनमधून एल. ई डी. चा भाग्यवान विजेता काढण्यात आला. हा मान श्रीरामपूर येथील योगेश एस. कारवा यांना मिळाला.

आजचे भाग्यवान विजेते
एस. यू. दुधेडिया, अनुराधा प्रकाश बळे, अनिल पी. गुलाटी, सतिश बागुल, राहुल हरिभाऊ जंगले, दिपाली प्रदिप वैद्य, अरुणा प्रसाद गड्डे, रिना कदम, अपूर्वा अशोक सस्कर, प्रेरणा सुभाष भोगे. या विजेत्यांनी आपले बक्षिस दै. सार्वमत कार्यालय, सोमाणी बिल्डिंग,. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर येथून ओळखपत्र दाखवून घेऊन जावीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या