Saturday, April 27, 2024
Homeनगरसरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत : अण्णा हजारे

सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत : अण्णा हजारे

अहमदनगर (प्रतिनिधी) – गावचा सरपंचच नव्हे, तर राज्याचा मुखमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, तीच खरी लोकशाही म्हणता येईल. खेड्यांचा विकास राजकीय पक्ष आणि गटांमुळेच खुंटला आहे. घटनेप्रमाणे समुदायाला निवडणूक लढवता येत नाही, ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे असे, मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

थेट जनतेतून सरपंच निवडला जावा, हेच महत्त्वाचे आहे. जर तो निवडला जात नसेल तर यासंबंधाने राज्यभर आंदोलन उभे होणे गरजेचे आहे. लोकशाही लोकांची आहे, लोकांच्या लोकसहभागातूनच ती चालली पाहिजे असेही ही अण्णा म्हणाले. राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते पाटील, महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात आणि सरपंच पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली.

- Advertisement -

याप्रसंगी अण्णा यांनी हा संदेश दिला. हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे त्यांनी लिखित संदेशाद्वारे सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी अण्णांच्या मौनास सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या