Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यात सारी रुग्णाची संख्या 42

जिल्ह्यात सारी रुग्णाची संख्या 42

कोरोना : 21 अहवाल निगेटीव्ह; 33 अहवालाची प्रतीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी 21 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल गुरूवारी रात्री निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सारीचे रुग्णांची संख्या वाढत असून त्यांचा आकडा 42 पर्यंत पोहचला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी पाठवलेले 13 आणि गुरूवारी पाठविण्यात आलेले 20 असे 33 स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे आधीच चिंतेत असणार्‍या जिल्ह्यात सारी रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.

जिल्ह्यात 11 एप्रिलपासून सारीचे आजपर्यंत 42 रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यामध्ये 23 पुरूष, 15 महिला, 4 मुलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाने 1 हजार 107 व्यक्तींना आरोग्य संस्था पातळीवर आणि घरात क्वारंटाईन केले आहे. यात 725 हे जिल्हाभर संस्था पातळीवर तर 382 हे होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाची नजर आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा 28 वर पोहचलेला आहे.

यातील श्रीरामपूर आणि कोपरगावच्या रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी जिल्ह्यात तिघे कोरोना मुक्त झालेले आहेत. दरम्यान कोरोना पाठोपाठ चोरपावलींनी जिल्ह्यात सारीचा प्राद़ृर्भाव वाढत असून कोपरगाव येथील महिला सारीसदृश आजाराने झालेला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने आतापर्यंत कोरोना संसर्गाचा संशय असल्याने आधी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्था आणि काही दिवसांपासून पुण्याच्या लष्कराच्या प्रयोग शाळेत 1 हजार 215 व्यक्तीेंच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातील 1 हजार 145 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.

तालुकानिहाय क्वारंटाईन (कंसात होम क्वारंटाईन)
नेवासा 26 (16), अकोले 0 (10), जामखेड 0 (65), कोपरगाव 21 (3), कर्जत 1(3), पारनेर 13 (3), पाथर्डी 16 (15), राहाता 101 (25), राहुरी 59 (9), नगर ग्रामीण 46 (35), संगमनेर 33 (36), शेवगाव 19 (1), श्रीगोंदा 18 (14) नगर मनपा 263 (146), जिल्हा रुग्णालय 101 असे 725 (382).

- Advertisment -

ताज्या बातम्या