Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

दरोडेखोरांचा सराफावर हल्ला; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

Share
संगमनेर : घुलेवाडीत हल्लेखोराकडून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, Latest News Sangmner Thife Firing Injured

संगमनेरातील घुलेवाडीत थरार

संगमनेर (प्रतिनिधी)-  घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर दरोडेखोरांनी हल्ला केला. मुद्देमाल लुबाडून धूम ठोकत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात रस्त्याने जाणार्‍या मोेटारसायकलवरील तरुणाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर नाशिकच्या दिशेने पसार झाले.

ही घटना घुलेवाडी शिवारातील आदर्शनगर येथे काल सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. सदर तरुणाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सदर सराफावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अविनाश सुभाष शर्मा (रा. केशवनगर, घुलेवाडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घुलेवाडी फाटा येथे साईकृपा ज्वेलर्स या नावाने ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी यांचे दुकान आहे.

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर चिंतामणी हे दुकान आवरुन दुकानातील मुद्देमाल सोबत घेवून आपल्या वेगनार कार क्रमांक एमएच 12 ईएम 0107 मधून घराकडे जाण्यासाठी निघाले. आदर्शनगर येथे असलेल्या त्यांच्या घराजवळ आले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या कारमध्ये चौघेजण होते. कारमधून तिघेजण उतरले. लाकडी दांड्याच्या सहाय्याने तिघांनी मारुती वेगनार कारवर हल्ला केला. ज्ञानेश्वर चिंतामणी यांनी आरडाओरड केला.

तोपर्यंत हल्लेखोरांनी गाडीच्या सर्व काचा फोडल्या. कारमधील बॅग घेवून हल्लेखोर पसार होण्याच्या मार्गावर असतांना त्याचवेळी आवाजामुळे तेथून मोटारसायकलवरुन जात असलेले अविनाश शर्मा व वाळूंज हे दोघेजण थांबले. त्याचवेळी हल्लेखोरांच्या पांढर्‍या कारमध्ये बसलेल्या एका हल्लेखोराने शर्मा यांच्यावर गोळीबार केला. शर्मा यांच्या डाव्या मांडीतून गोळी पोटात गेली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्याने चिंतामणी, शर्मा यांनी आरडाओरड केला. हल्लेखोर चारचाकी वाहनातून नाशिकच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती कळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी अविनाश शर्मा यास तातडीने तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र शर्मा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोषन पंडीत हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस अधिकार्‍यांना घटनेच्या तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. दरम्यान घटनास्थळी एक जिवंत बुलेट (बंदूकीची गोळी) मिळून आले.

घटनेची माहिती श्रीरामपूरच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जावून जखमी तरुणाची माहिती घेतली. या प्रकरणा संदर्भात पोलीस अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!