Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर पोलीस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी अनेकांची फिल्डिंग

Share
file photo

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांची बढतीवर बदली होण्याची चर्चा सुरू झाल्याने या पोलीस ठाण्यात आपली नियुक्ती व्हावी, यासाठी काही अधिकार्‍यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील नावाजलेले पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी अधिकारी आग्रही असतात. हे पोलीस ठाणे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. शहराचा आवाका मोठा असल्याने या पोलीस ठाण्यात काम करावयाची संधी मिळावी, असा बहुतेक अधिकार्‍यांचा प्रयत्न असतो.

संगमनेरचे पोलीस निरीक्षक परमार यांना लवकरच पदोन्नती मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही अधिकार्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आपलीच नियुक्ती व्हावी, यासाठी ते राजकीय वापरही करत असून त्यांना अद्याप तरी यश आलेले नाही. संगमनेर पोलीस ठाण्याचा एवढा आग्रह कशासाठी याचे गुपीत लपून राहिलेले नाही.

या पोलीस ठाण्याच्या कारभाराची अनेकदा चर्चा होत असते. त्यामुळे या पोलीस ठाण्यात कुणाला काम करण्याची संधी मिळते याकडे नागरिकांचे व पोलिसांचेही लक्ष लागले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!