Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरात 1100 किलो गोमांस जप्त

संगमनेरात 1100 किलो गोमांस जप्त

भाजीपाल्याखाली लपवून नेले जात होते

संगमनेर (शहर प्रतिनिधी)– बेकायदेशीररित्या गोमांसची वाहतूक करणार्‍या टेम्पोसह 1 लाख 32 हजार रुपयांचे 1100 किलो गोमांस जप्त केल्याची कारवाई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी खांडगाव फाट्या जवळ केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

राज्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतानाही संगमनेरात मोठ्या प्रमाणावर अशा जनावरांची कत्तल करून हे मांस मुंबईला पाठवण्यात येता येते. सोमवारी सायंकाळी एका भाजीपाल्याच्या टेम्पोतून कॅरेटखाली मांस लपवून विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली पोलिसांनी पाठलाग करून नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्यावरील खांडगाव पुलाच्या खाली एक टेम्पो (क्र. एम. एच. 03 सी. व्ही.0849) पकडला या टेम्पोमध्ये 1100 किलो गोमांस त्यांना आढळले. पोलिसांनी पंचनामा करून हे मांस ताब्यात घेतले.

याप्रकरणी मोबील अब्दुल लसन शेख (वय 26), आरबाज अब्दुल हमीद कुरेशी (वय 20, रा. कुर्ला मुंबई), जहिर अन्वर कुरेशी (फरार), बुंदी उर्फ मुद्दसिन अब्दुल करीम कुरेशी (संगमनेर, फरार) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 चे (सुधारणा) 2015 कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या