Saturday, April 27, 2024
Homeनगरसंगमनेरात दुसर्‍या दिवशीही 7 करोनाबाधीत

संगमनेरात दुसर्‍या दिवशीही 7 करोनाबाधीत

निमोणमधील दोेघे, खळी व कौठे कमळेश्वर, डिग्रस येथे प्रत्येकी एकाचा समावेश

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर शहरासह करोना तालुक्यात पसरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात दोन करोना बाधीत तर तालुक्यातील ग्रामीण भागातील खळी पिंपरी, कौठे कमळेश्वर, डिग्रस येथे दुपारी प्रत्येकी एकजण असे एकूण 5 रुग्णांची नव्याने भर पडली. तर रात्री उशीरा आणखी 2 करोना बाधित अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक आठ वर्षीय मुलगा तर 40 वर्षीय पुरुष व्यक्ती चा समावेश आहे. आज एकूण 7 करोना बाधीत आढळले आहेत. तर तालुक्यातील करोना बाधीतांची संख्या 46 वर गेली आहे. शनिवारी 7 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले होते. केवळ दोन दिवसांत 14 जण पॉझिटिव्ह आढळल्याने संगमनेरकर हादरले आहेत.

- Advertisement -

रात्री उशीरा आलेल्या अहवालातील दोघेही निमोण येथील सकारात्मक व्यक्तीच्या कुटूंबातील आहेत. काल सिव्हील हॉस्पिटलमध्ये जास्त जोखीम असलेले संपर्क म्हणून पाठविण्यात आले.कुटुंब काही दिवसांपूर्वी मुंबईहून आले होते.

तत्पूर्वी शहरातील कोल्हेवाडी रोड लगत कॉलनीत याआधी बाधीतांच्या संपर्कात आलेल्या 22 व 24 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. तर 27 वर्षीय तरुण तालुक्यातील खळी येथे आढळून आला आहे. सदर तरुण हा मुंबईहून खळी येथे आला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कौठे कमळेश्वर येथील एक 37 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईहून डिग्रस येथे आलेल्या एका 52 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त होताच तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी तातडीने कौठे कमळेश्वर येथे भेट दिली. तेथील नागरीकांना काही सूचना केल्या. तर बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 8 व्यक्तींना पुढील तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले. खळी व डिग्रस येथे मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणावरुन येणार्‍या नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवून योग्य ती काळजी घेण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य व महसूल विभाग करत होते. दरम्यान खळी येथिल तो तरुण मुबंई येथून आल्याची माहिती मिळताच प्रशासनाने त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते.

परंतू याकाळात तो अनेक नागरीकांच्या संपर्कात आला होता. त्याला दोन दिवसापूर्वी त्रास होत असल्याने आश्वी व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर सायंकाळी उशीरा त्याच्या संपर्कातील 15 ते 16 जणांना तात्काळ तपासणीसाठी नगरला हलविण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली. तर इतर 30 ते 35 नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. असे असले तरी या घटनेने स्थानिक नागरीकांसह पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच डिग्रस येथिल करोना बाधित महिलेला मुंबई येथून आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. तीन दिवसापूर्वी या महिलेला घरी सोडण्यात आले होते. मात्र दोन दिवसापूर्वी या महिलेला त्रास सुरु झाल्याने संगमनेर व नतंर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कातील 6 व्यक्ती तपासणीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. तर इतर संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. दरम्यान यावेळी स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य, महसुल व पोलीस यत्रंणानी त्या ठिकाणी दाखल होत योग्य ती खबरदारी घेत उपाय योजना करुन नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या