Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर पूर्ण लॉकडाऊन

संगमनेर पूर्ण लॉकडाऊन

धांदरफळचे 36, कुरणरोड 18, काटेज रूग्णालय 1 आणि घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातील तीन असे एकूण 58 जण तपासणीसाठी नगरला

संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे करोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सात व्यक्ती करोना बाधीत आढळल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी संगमनेर व धांदरफळ येथे भेटी देत संगमनेर शहर, धांदरफळ बुद्रूक, कुरण हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेे. या सर्व ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या धांदरफळ 36, कुरणरोड 18, कॉटेज हॉस्पिटल 1 आणि घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयातीलल 3 असे एकूण 58 संशयीत व्यक्तींची तपासणी करीता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शहरातील नायकवाडपुरा, रहेमतनगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उन्मदनगर, एकतानगर, शिंदे नगर येथे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला होता.

मात्र आता कुरणरोड येथे एक महिला करोना बाधीत आढळल्याने संगमनेर शहरातील इस्लामपुरा, कुरणरोड, बिलाल नगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुर्नवसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर यासह कुरण गाव व धांदरफळ बुद्रूक हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर क्षेत्रापासून दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर कोरो एरिया म्हणून घोषित करण्यात आला आहे. सदर क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 9 मे 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

संगमनेर शहरात विविध भागात करोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने संगमनेर शहर व परिसरामध्ये करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेर शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित करण्यात आले आहे. हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करणे, क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा परिसर पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काल शनिवारी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह संगमनेरात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संगमनेर शहर, धांदरफळ येथे भेट देऊन अधिकार्‍यांना सूचना केल्या.

संगमनेर शहराच्या चारही दिशा लॉक
अकोले नाका, 132 के. व्ही., घुलेवाडी चौफुली, कुरण गावात जाणारा रस्ता, समनापूर चौफुली, संगमनेर खुर्द चौफुली हे शहरात येणारे रस्ते प्रशासनाने लॉक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या