Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपूर – वाळू वाहतुकीस विरोध केल्याने वाळूतस्करांनी लावला सरपंचास कट्टा

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – वाळू वाहतुकीस विरोध केला म्हणून वाळूतसकरांनी तालुक्यातील जाफराबादचे सरपंच संदीप शेलार यांना गावठी कट्टा लावुन जीवे ठार मारण्याची दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

देशभरात कोरोनोमुळे कलम 144 लागू असल्याने जाफराबाद गावाने देखील गाव पूर्णतः बंद ठेवुन प्रमुख रस्ते काट्याच्या साह्याने गावाच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहे. वाळू वाहतुकीस विरोध केल्याने विशाल गुंजाळ, ऋतिक गुंजाळ, ऋतिक धनवटे, पवन उपळकर, सागर उपळकर व इतर आरोपींनी संदीप शेलार यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!