Friday, April 26, 2024
Homeनगरवाळूचा अवैध उपसा प्रकरणी दंडाचा सातबारावर बोजा

वाळूचा अवैध उपसा प्रकरणी दंडाचा सातबारावर बोजा

आंबील ओढ्यात पुन्हा त्याच शेतात वाळूचा अवैध उपसा

श्रीगोंदा ( तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा शहरात घोडेगाव रस्त्यालगत असलेल्या आंबीलओढ्यात तसेच तालुक्यातील घोड, भीमा नदीबरोबर छोटेमोठे ओढे, नाल्यात अवैध वाळूउपसा हा राजरोसपणे पणे सुरू असताना महसूल विभाग, पोलीस प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा तसेच गौण खनिज विभाग असे कोणीच ठोस कारवाई करत नाही. ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वी अवैध वाळूउपसा केला, त्यांना चार लाख रुपये दंड केला गेला.

- Advertisement -

ही रक्कम न भरल्यास थेट सात बारा उतार्‍यावर बोजा चढवण्यात आला होता. त्या शेतकर्‍यांना हा बोजा कमी करत पुन्हा याच शेतात हजारो ब्रास अवैध वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आपल्या शेतातील उभे पीक वाया घालवत मोठे मोठे खड्डे करत वाळू काढली जात आहे.

आंबील ओढ्यात घोेगाव लगत खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. कारवाई करण्यासाठी महसूल पथक येऊ नये यासाठी रस्ता खोदून टाकला जातो आणि रात्री उपसा करून जेसीबी आणि ट्रॅक्टरने वाळू भरून वाहने गायब होत आहेत. हिरडे वस्ती, घोेगाव रस्ता येथील आंबील ओढा पुढे भिंगाण गावापर्यंत नदी पात्रात सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अंबिल ओढा व देवनदी पात्रात कित्येक महिन्यांपासून बेसुमार वाळूउपसा सुरू असून महसूल विभागाचे वाळू चोरीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी वाळूउपशामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने नदीच्या पात्राची दिशा बदलते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या बेसुमार वाळू उपशाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक महिन्यांपासून अवैधरीत्या वाळूची तस्करी चालू आहे. शेतातून वाळूच्या वाहनांची ये जा करण्यात येते. त्या ठिकाणी जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत.

नदी पात्रात जेसीबीच्या साहाय्याने 10 ते 12 फृट लांबीचे खड्डे घेतल्याने मोठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नदी पात्रातच वाळूला चाळण मारत असल्याने दगड धोंड्यांचा मोठा ढीग पडला आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. स्थानिक परिसरातील काही तस्कर वाळूउपसा करत आहेत. हा वाळूऊपसा बंद करण्याची मागणी केली जात आहे.

वाळूसाठी सुपीक जमिनीची चाळण
आंबील ओढ्यात सुरू असलेला अवैध वाळूउपसा एक सेवानिवृत्त अभियंत्यांच्या शेतात खुले आम सुरू आहे .विशेष म्हणजे यापूर्वी याच ठिकाणी अवैध वाळूउपसा केल्याने झालेल्या दंडाची वसुलीसाठी सातबारा वर बोजा चढवला होता. आता ही सुपीक असलेली जमीन केवळ वाळूसाठी उकरली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या