Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डी – साईबाबा संस्थानने साडेचार हजार कर्मचारी सुट्टीवर

शिर्डी – साईबाबा संस्थानने साडेचार हजार कर्मचारी सुट्टीवर

शिर्डी ( शहर प्रतिनिधी ) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासन विक्रीचे प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5% कर्मचाऱ्यांवर राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आहे अनेक कंपन्या व खाजगी निमशासकीय संस्था यांना कर्मचारी कपातीचा सूचना दिल्या आहेत कर्मचारी यांचे पगार या काळात कपात करू नये असा आदेश दिला आहे. मात्र साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने आदेशानंतरही काही दिवस कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले होते व शिर्डी सार्वमतचे प्रतिनिधींंनी संबंधित विषयाला वाचा फोडण्यासाठी प्रशासकीय कार्यालय गाठले असता झोपलेले संस्थान खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून तातडीने साडेचार हजार कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली मात्र दोन ते तीन दिवस विलंब करण्याचे कारण काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय संस्थांचे पाच टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालविण्याचे आदेश पारित केले होते. देशात नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थांनच्या सुमारे साडेसहा हजार कर्मचा-यांना देशात संचारबंदी लागू असतानाही त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा आदेश पारित झाल्यानंतरही विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने कामावर सोमवार दि. 23 मार्चपर्यंत कामावर बोलवण्यात आले होते. याबाबत दैनिक सार्वमतचे शिर्डी शहर प्रतिनिधींंनी या विषयाला वाचा फोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गाठली. त्यानंतर झोपलेले संस्थान खडबडून जागे झाले असून सोमवार दि. 23 रोजी दुपारी बारा वाजेनंतर ठेकेदारमार्फत कामावर असलेल्या सुमारे 1950 कर्मचारी त्याचप्रमाणे आऊटसोर्सिंगचे 2500 कर्मचारी असे एकूण साडेचार हजार कर्मचाऱ्यांना तातडीने तोंडी आदेश देत सुट्टी देण्यात आली असल्याचे कामगार विभागाकडून सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 418 झाली असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात वाढत आहे.राज्यात 89 झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. राज्यातील मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांनी याबाबत जनजागृती करून विषेश काळजी घेत आहे. मात्र देशातील महत्त्वाचे नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान याबाबत गाफील का राहिले ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. साईबाबा संस्थानमध्ये प्रसादालय, भक्तनिवास, सुरक्षा विभागात कायमस्वरूपी तसेच कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्यांंची संख्या साधारणपणे साडेसहा हजारांहून जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्थानने साईमंदीर बंद केले आहे हा निर्णय स्वागतार्ह असला तरी मात्र दि. 17 मार्चपासून दि. 22 मार्चपर्यंत पाच दिवसात साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून काय साध्य केले . सुरक्षा यंत्रणा सोडून दिली तर इतर विभागात कर्मचाऱ्यांना काय काम होते. गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आला मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामासाठी बोलावणे हे देखील नियमांचे उल्लंघन नाही का असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

दरम्यान साईसंस्थानचे कायम सेवेतील सुमारे 1950 कामगारांना अद्याप सुट्टीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे माहिती मिळाली असून याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. संस्थान प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या संख्येत नियंत्रण आणावे हि माफक अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या