Thursday, April 25, 2024
Homeनगरलॉकडाऊनच्या 60 दिवसांच्या काळात साईबाबांच्या झोळीत 3 कोटी 22 लाखांचे दान

लॉकडाऊनच्या 60 दिवसांच्या काळात साईबाबांच्या झोळीत 3 कोटी 22 लाखांचे दान

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- अवघ्या विश्वाला ‘सबका मालीक एक’ संदेश देणार्‍या साईबाबांच्या झोळीत देश लाँकडाऊन असतांना मात्र डोनेशन सुरुच असून देश विदेशातील भाविकांनी करोना व्हायरसच्या संकटात देखील दोन महिन्यांपासून श्री साईसमाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असताना 17 मार्च ते दि. 16 मे 2020 या 60 दिवसांच्या कालावधीत 21 हजार 649 साईभक्तांकडून ऑनलाईनव्दारे 03 कोटी 22 लाख 10 हजार 247 रुपये देणगी साई संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

देशात करोनाने थैमान घातले असून चौथ्या टप्प्यात देशातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या 85 हजारांहून जास्त झाली आहे. लॉकडाऊन वाढवणार की काय याचा निर्णय होणार आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शिर्डीतील साईमंदीरात ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून कोटी रुपयांचे दान मिळत आहे. करोनाच्या संकटामुळे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले असून 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

दि.17 मार्च ते 16 मे पर्यंत देशविदेशातील साईभक्तांकडून ऑनलाईनव्दारे 03 कोटी 22 लाख 10 हजार 247 रुपये देणगी साईबाबा संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. मात्र करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवू नये म्हणून भारत सरकार व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून संस्थानच्या वतीने 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.

श्री साईबाबांची महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली आहे. साईबाबांचे भक्तगण देशात व परदेशात लाखोंच्या संख्येने आहे. साईसमाधी मंदिर बंद कालावधीत टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सद्वारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहे. श्री साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरी देखील भाविकांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. दरम्यान साठ दिवसात आँनलाईन देणगीद्वारे 3 कोटी 22 लाख 10 हजार रुपये प्राप्त झाली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या