Type to search

Featured हिट-चाट

साहो चित्रपटाची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

Share

मुंबई | वृत्तसंस्था

प्रसिद्ध अभिनेता वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालापती उर्फ  प्रभास व श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा जोरात होत आहे. जवळपास 350 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चंगळ कमाई केली आहे.

हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये ‘साहो’ प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी ‘साहो’ने तब्बल 68 कोटी रुपये कमावले आहेत. तर भारतात हिंदी भाषेतील चित्रपटाने 24.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या वर्षात आता पर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये साहो तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट आहे. पहिल्या क्रमांकावर ‘भारत’ तर दुसऱ्या क्रमांकावर ‘मिशन मंगल’ हे चित्रपट आहेत. ‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धा कपूर सोबत जॅकी श्रॉफ,  नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!