Friday, April 26, 2024
Homeनगरग्रामीण भागातील दुकाने सुरू करण्यास मुभा

ग्रामीण भागातील दुकाने सुरू करण्यास मुभा

जिल्हा प्रशासनाच्या सुधारित आदेशाने अनेकांना दिलासा, सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाला हरवण्यासाठी तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारचे दुकाने सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

मनपा, नगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांसह एकल वसाहती लगत असतणारी निवासी संकूलातील सर्व दुकाने सुरू राहतील तथापि, अशा भागात एखाद्या गल्लीत/रस्त्यालगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारीच दुकाने सुरू राहतील. सर्व दुकानांमध्ये सामाजिक अंतर तत्वाचे पालन करावे गलागणार आहे. सलून दुकाने बंदच राहणार आहेत. रिक्षा वाहतूक व खासगी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.

या गोष्टी राहणार बंदच
विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम असेल. शिवाय कोणत्याही शैक्षणिक संस्था. शाळा, महाविद्यालये, सण, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळंही सुरू
ठेवता येणार नाहीत.. याशिवाय कोणतेही हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा-संमेलनं घेता येणार नाहीत. खासगी 3लासेसला बंदी. केवळ ऑनलाईन किंवा दुरस्थ शिकवणीस परवानगी राहणार आहे. 65 वषारवरील व्येी आणि गर्भवती महिला व दहा वषारपेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवेशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई आहे.

डिझेल 24 तास मिळणार
डिझेल आता 24 तास मिळणार आहे. पूर्वी याला मर्यादा होती. तसेच पेट ्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपयरत राहणार आहे. डिझेल आता कधीही मिळणार असल्याने शेती कामांना वेग येणार आहे.

यांना मुभा

  • चिकन व अंडी दुकाने व वाहतूक सेवा
  • सरकारी आणि खाजगी कार्यालये सुरू
    राहणार
  • अत्यावश्यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्ये
    केवळ वाहनचालक व इतर दोन व्येी ंना
    परवानगी. दुचाकी वाहनांकरीता केवळ वाहन
    चालकास परवानगी राहणार आहे.

दारू दुकानं, बार बंदच

कारवाईचा राज्य उत्पादन शुल्कचा इशारा

करोनाला हरवण्यासाठी तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी राज्य सरकारने काल जारी केली आहे. त्यानुसार सर्वत्र दारू दुकाने काही अटींसह सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. पण नगरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने यास मनाई केली आहे. एवढेच नव्हेतर परवाना रद्दचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्कने याबाबत रात्री उशीरा परिपत्रक जारी केले आहे. त्यात दि. 3 मे रोजी कोरडा दिवस संपत असेल तरी जोपर्यंत या कार्यालयाकडून कोणतेही लेखी आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कुणीही मद्यविक्री दुकाने आणि बार सुरू करू नयेत. असे आढळून आल्यास व नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व झोनमधील शहरांमध्ये दारू दुकाने काही अटींसह सुरू करण्यात मुभा देण्यात आली. त्यामुळे दारू दुकान चालक-मालक आणि मद्यशौकीन खुश झाले होते. पण आता राज्य उत्पादन शुल्कने पुढील आदेश येईपर्यंत मनाई केल्याने संभ्रम वाढला आहे. तसेच मद्य शौकिनांच्या आनंदात विरजण पडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या