फसवणूक करणार्‍या ‘रोहिदासजी’च्या अध्यक्षाला अटक

फसवणूक करणार्‍या ‘रोहिदासजी’च्या अध्यक्षाला अटक

नोकरीच्या अमिषाने पैसे घेतल्याच्या 20 फिर्यादी : सहा आरोपी फरार

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी जिल्ह्यातील अनेक तरूणांकडून नोकरीला लावून देण्यासाठी पैसे घेवून फसवणूक केली. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या 20 फिर्यादी दाखल झाल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे (रा. आलमगीर, भिंगार) याला सोमवारी (दि. 30) रात्री खांडगाव (ता. पाथर्डी) येथून अटक केली.

मंगळवारी (दि. 31) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांनी जिल्ह्यातील अनेक तरूणांकडून नोकरीला लावून देण्यासाठी पैसे घेवून फसवणूक केली. अनेक वर्षे नोकरी करून देखील पगाराची रक्कम दिली नाही. ऑगस्ट 2019 मध्ये फसवणुकदारांनी भिंगार पोलीस ठाण्यात विश्वस्तांविरोधात पहिली फिर्याद दिली आहे. नोकरीसाठी भरलेली रक्कम व पगाराची न मिळालेली रक्कम सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

ऑगस्टपासून आत्तापर्यंत फसवणुकीच्या 20 फिर्यादी दाखल झाल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे गुन्हाचा तपास करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा शोध घेत असताना पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे सुभाष साळवे असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक लोखंडे व त्यांच्या पथकाने साळवे याला सोमवारी (दि. 30) रात्री अटक केली.

फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा पोलिस अधीक्षक व भिंगार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना 12 मार्चला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. रोहिदासजीच्या विश्वस्तांवर न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी दाखल झाल्या आहेत. फसवणूकीची पहिली फिर्याद 20 ऑगस्ट 2019 रोजी दाखल झाली आहे. सात महिन्यानंतर पोलिसांनी अध्यक्ष साळवे याला अटक केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अध्यक्षाला अटक केली असली तरी अजून सहा आरोपी पसार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com