Type to search

Featured नाशिक

बहिणाबाई पेट्रोल पंपावर दरोडा; कामगारानेच रचला लुटीचा बनाव

Share

नांदगाव । प्रतिनिधी

शहरातील मनमाड रोडवरील बहिणाबाई पेट्रोल पंपाच्या कँबीनच्या काचा, कॉम्पुटर एलसीडी, मॉनिटर फोडून नुकसान करून पेट्रोलच्या पंपावर दरोडा पडून 1 लाख 98 हजार 707 रुपये चोरीस गेले होते. याप्रकरणी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. हा प्रकार रविवारी मध्यरात्री सुमारास घडला होता. अवघ्या काही तासाच्या आत पोलिसांनी केलेल्या तपास येथील कामगारानेच लुटीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मनमाड रोडवरील बहिणाबाई पेट्रोलवर रविवारी रात्री 1:52 ते 2:12 सुमारास अज्ञात इसमांनी कँबीनच्या काचेचे, कॉम्पुटर एलसीडी, मॉनिटर फोडून नुकसान करून पेट्रोलवर दरोडा पडून 1 लाख 98 हजार चोरीस गेलेस असून पेट्रोल पंपावर दरोडा पडला असल्याचे फिर्याद पद्ममराज काकासाहेब वेळापुरे यांनी दिली होती.

पो. नि. अनिल भवारी यांनी तपासाचे चक्रे फिरुन पंपावरील कामगार अविनाश विनायक पवार (रा. नांदगाव) यास ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखताच गुन्हाची कबुली दिली. पवार यांच्याकडुन 1 लाख 27 हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात असून याप्रकरणी पोलिसात भादवी 381,427 गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अनिल भवारी, स.पो.नि.बजरंग, चौघुले, भारत कांदळकर, राकेश चौधरी,पंकज देवकाते, प्रविण गांगुर्डे, सागर कुमावत अधिक तपास करीत आहे.-

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!