Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सोलापूर हायवेवर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Share
दरोडेखोरांची टोळी जेरबंद, Latest News Robber Arrested Crime News Ahmednagar

एलसीबीची सोलापूर हायवेवर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेल्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले. सोलापूर हायवेवरील वाळुंज शिवारात गायकवाड फार्म हाऊससमोर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

अटल ऊर्फ अतुल ऊर्फ योगेश ईश्वर भोसले, सोन्या ऊर्फ लाल्या ऊर्फ राजेंद्र ईश्वर भोसले, पाल्या ऊर्फ जमाल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले, मटका ऊर्फ नवनाथ ईश्वर भोसले, ईश्वर गणा भोसले (सर्व रा. बेलगाव, कर्जत), जितेंद्र संसार भोसले (रा. आष्टी) अशी पोलिसांनी पकडलेल्या सात दरोडेखोरांची नावे आहेत. नाज्या नेहर्‍या काळे ऊर्फ सोमीनाथ दिलीप काळे (रा. घुमरी,कर्जत) हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. नगर तालुक्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली या टोळीने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

कर्जतच्या ईश्वर भोसलेची टोळी नगरात दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला सोलापूर हायवेकडे रवाना करत कारवाईचे आदेश दिले. गायकवाड फार्महाऊसजवळ पोलिसांनी दरोडेखोरांच्या मोटारसायकली अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करत सौम्य बळाचा वापर करत सात जणांच्या मुसक्या आवळल्या, एक मात्र अंधाराचा फायदा घेत पळाला.

पकडलेल्यांकडून पोलिसांनी चार मोटारसायकली, सुरा, तलवार, कटावणी, वायर रोप, लाकडी दांडके आणि मिरची पूड असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बाप-लेकांची गुन्हेगारी
पकडलेले आरोपी हे सराईत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. ईश्वर भोसले विरोधात कर्जत, आष्टी, सांगोला येथे 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांची मुलं पाल्या, संदीप, सोन्या आणि अटल यांच्याविरोधातही आष्टी,कर्जत,जामखेड, पाथर्डी, अंमळनेर, बारामती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे चौकशीअंती समोर आले. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये ईश्वर भोसले व त्यांच्या पाच मुलांचा समावेश आहे. ते सगळेच सराईत गुन्हेगार निघालेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!