Friday, April 26, 2024
Homeनगरमहसूल विभागाची वाळू माफियांविरोधात कारवाई

महसूल विभागाची वाळू माफियांविरोधात कारवाई

दोन दिवसांत चार लाखांचा दंड

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जामखेड मध्ये वाळूमाफिया यांच्या विरोधात महसूल विभागाने मोहीम उघडली असून तहसीलदार विशाल नाईकवाडेसह त्यांच्या पथकाने दोन दिवसांत तीन वाहने ताब्यात घेऊन एकूण तीन वाहनाना तीन लाख 90 हजारांचा दंड वसूल केला.
जामखेड तालुक्यातील अवैधरीत्या वाळूउपसा व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना प्राप्त होताच त्यांनी तालुक्यातील कुसडगाव व डिसलेवाडी येथे रात्री साडे अकरा वाजता या वाहनांवर कारवाई केली.

- Advertisement -

या कारवाईत कुसडगाव येथे ट्रॅक्टर व डिसलेवाडी येथे ट्रक पकडण्यात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या पथकाला यश आले. यामध्ये कुसडगाव येथील ट्रॅक्टरला एक लाख 30 हजार रुपये याप्रमाणे दंड करण्यात आला आहे. तसेच डिसलेवाडी येथील ट्रकला देखील एक लाख 30 हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

ही कारवाई 24 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली. तसेच 25 डिसेंबर रोजी देखील तालुक्यातील जवळा येथे अनेक दिवसांपासून तहसीलदारांना गुंगारा देऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियावर सापळा रचून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना अखेर कारवाई करण्यात यश आले आहे.

तहसीलदारांनी 25 रोजी दुपारी सीना नदी परिसरामध्ये हा ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. त्यानुसार त्या वाळु माफियाला एक लाख तीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तहसीलदारांनी वाळू माफिया विरोधात सुरू केलेल्या कार्यवाही मुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वाळू माफियांविरोधात मोहीम उघडल्याने तालुक्यातील जवळा, फक्राबाद, पिंपरखेड, तसेच सोनेगाव, धनेगाव, आगी परिसरातील नदीतील अवैधरीत्या वाळूउपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. तेथील वाळू माफियांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या सर्व करावाईमध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे, निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, जामखेड मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे, तलाठी काळे, देसूरकर, कारंडेे भाऊसाहेब, कटारनवरे, धुमाळ, चौधरी, जोशी, नागोरे अशा तीन पथकांनी ही कारवाई केली.

कुसडगाव व डिसलेवाडी येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून चार लाखांचा दंड केला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन ग्रामपातळीवरील ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच, सदस्य ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल व त्या समितीचा सदस्य सचिव त्या गावाचा तलाठी आहे. त्यामुळे अवैध गौण उत्खनन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवहान तहसीलदार विशाल नाईकवाडे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या