Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय

Share
नगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय Latest News Religious Sites Found Ten Ethnicities Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – नेवासा, जामखेडनंतर आता नगरमधील धार्मिक स्थानातून १० परप्रांतीय नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगर शहरातील भोसले आखाडा परिसरासरातील बुरूडगाव रोडवरील धार्मिक स्थळी ही कारवाई आज बुधवारी सकाळी करण्यात आली. या दहा परप्रांतीयांकडे चौकशी केली असता ते २६ मार्चला बेळगाव, कर्नाटक येथून नगर शहरात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी मशिद विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कलम १८८ नुसार हा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नगरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!