Type to search

Featured नाशिक

टपाल खात्यात साडेतीन हजार जागांची भरती; जिल्ह्यात 112 जागा भरणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

रिक्त असलेल्या टपाल विभागातील पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाला आहे. राज्यात तब्बल 3 हजार 650 पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर भर देण्यात आला आहे. 31 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार पात्र असणार आहेत. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 3 हजार 650 रिक्त जागा भरणार असल्याची टपाल विभागाची माहिती जाहीर केली आहे.

त्यानुसार ब्रांच पोस्ट मास्तर, सहायक ब्रांच पोस्ट मास्तर, डाक सेवकांची पदे भरण्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ही पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत टपाल सेवकांवर कामाचा ताण येत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात आणि यावर्षी ऑक्टोबरमध्ये टपाल सेवकांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात आंदोलन पुकारले. तेव्हा लवकरच पदे भरणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.

विधानसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या भरती प्रक्रियेला हिरवा कंदिल देण्यात आला. या भरतीअंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुमारे 112 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात योग्यरीत्या तत्पर सुविधा पुरवण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांची भरती केली जात असल्याचे टपाल विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

असा करा अर्ज

टपाल विभागाच्या भरतीसंदर्भात सर्व माहिती https://maharashtrapost.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. इच्छुकांना अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर नोंदवता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना लॉगिन तयार करावे लागेल. 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असतील. तर नियुक्त होणार्‍यांना प्रतिमहिना 10, 000 ते 14,500 रुपये वेतन असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी 100 रुपये असून एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!