Type to search

Featured टेक्नोदूत

बहुप्रतीक्षित रियलमी एक्स 2 प्रो येत्या 20 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच

Share

नवी दिल्ली:

गेल्या मंगळवारी रिअलमी एक्स 2 प्रो हा बहुप्रतीक्षित मोबाईल फोन चीनी बाजारात दाखल झाला आहे. रिअलमी कंपनीने आपला पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तारीख निश्चित केली आहे. रिअलमीने जाहीर केले आहे की रिअलमी एक्स 2 प्रो 20 नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल होईल. यासाठी कंपनी नवी दिल्ली येथे कार्यक्रम आयोजित करणार आहे.

रिअलमी एक्स 2 प्रोची भारतीय किंमत आणि उपलब्धता या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात येणार आहे. मुख्य वैशिष्ट्या मध्ये रिअलमी एक्स 2 प्रो स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर, 90 हर्ट्ज फ्लुईड डिस्प्ले, चार रियर कॅमेरा आणि 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

चीनी बाजारात रिअलमी एक्स 2 प्रोच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,699 चिनी युआन (सुमारे 27,200 रुपये) आहे. त्याच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,899 चीनी युआन (सुमारे 29,200 रुपये) आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज प्रकाराची किंमत 3,299 चीनी युआन (सुमारे 33,200 रुपये) आहे. हे तीनही प्रकार ग्रेडियंट फिनिशसह उपलब्ध आहेत, कलर व्हेरिएंट्सबद्दल बोलताना, हँडसेट ब्लू आणि व्हाइट अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!