बहुप्रतीक्षित रियलमी 5i या तारखेला होणार भारतात दाखल

बहुप्रतीक्षित रियलमी 5i या तारखेला होणार भारतात दाखल

नवी दिल्ली:

गेल्या अनेक दिवसांपासून रियलमी 5आय स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. येत्या 9 जानेवारीला रियमी 5आय स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल अशी अधिकृत घोषणा रियलमी कंपनीकडून करण्यात आली आहे. परंतु हा स्मार्टफोन नेमक कोणत्या बाजारात सादर करण्यात येणार आहे हे अजून कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

रियलमी स्मार्टफोनचा लॉन्चिंग सोहळा कंपनीच्या सोशल चॅनेल आणि अधिकृत वेबसाइटवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रियलमीने आपल्या ट्विटमध्ये मायक्रोसाईटचा देखील उल्लेख केला आहे. या साइटवर फोनच्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख केला गेला आहे.

रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनीही हा फोन 9 जानेवारीला भारतात लाँच करण्याविषयी माहिती दिली आहे. फ्लिपकार्टवर रियलमी 5 आयचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. रियलमी 5आयचे काही स्पेसिफिकेशन मायक्रोसाईटवर सूचीबद्ध केल्यामुळे सार्वजनिक झाले आहे.

रियलमी 5 आय स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी, क्वाड रियर कँँमरा सेटअप, 6.5 इंच मिनी ड्रॉप डिस्प्ले आणि ‘शक्तिशाली’ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे.

लवकरच रियलमी 5 आय स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती कंपनी द्वारे देण्यात येणार आहे. आजच्या घडीला रियलमी 5 सिरीजचे तीन स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. या मध्ये रियलमी 5, रियलमी 5S आणि रियलमी 5 Pro. आता रियलमी 5I आणण्याची कंपनीची तयारी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com