Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्ररिझर्व्ह बँकेच्या 50 हजार कोटींच्या पॅकेजने नाबार्डसह ‘यांना’ होणार मदत

रिझर्व्ह बँकेच्या 50 हजार कोटींच्या पॅकेजने नाबार्डसह ‘यांना’ होणार मदत

मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडून नाबार्डला २५ हजार कोटी रुपये, सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा केला जातो. एसआयडीबीय छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक आहे. तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या