अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंहवरील गुन्ह्याचा तपास नगरमध्येच; मालाड पोलिसांचा तपास करण्यास नकार

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) – चित्रपट अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंह या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद डिसेंबर 2019 मध्ये दाखल झाली होती. ही दाखल फिर्याद तोफखाना पोलिसांनी मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होती. परंतु, त्यांनी तपास करण्यास नकार दिल्याने या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस करणार आहे. मालाड पोलिसांकडून फिर्याद परत आल्याने तोफखाना पोलिसांनी पुन्हा या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी नगर येथील एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी या गुन्ह्याचा तपास करत आहे.

डिसेंबर 2019 मध्ये दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी एका समाजाच्या ग्रंथातील एका शब्दाचा चुकीचा वापर केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. नगर मधील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात डिसेंबर 2019 मध्ये गुन्हा नोंदविला. हा दाखल गुन्हा पुढील तपासकामी मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला होता. परंतु, नगरमधील समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर या गुन्ह्याचा तपास त्यांनीच करावा असे मालाड पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे मालाड पोलिसांनी तोफखाना पोलिसांना फिर्याद परत पाठवली आहे. मालाड पोलिसांकडून फिर्याद प्राप्त होताच तोफखाना पोलिसांनी पुन्हा या गुन्ह्याची नोंद पोलीस दफ्तरी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *