Thursday, April 25, 2024
Homeनगरकेशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीत धान्य मिळणार

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीत धान्य मिळणार

अहमदनगर (वार्ताहर)- नगर तालुक्यात करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल कुपन (केशरी शिधापत्रिकाधारक) यांना मे ते जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दराने धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. नगर तालुक्यात 15 हजार 458 शिधापत्रिकाधारक असून एकूण 69 हजार 146 लाभार्थी आहेत. त्यांना गहू दोन हजार 30 क्विंटल व तांदूळ एक हजार 355 क्विंटल धान्य गहू 8 रुपये व तांदूळ 12 रुपये प्रती किलो या दराने प्रति माह प्रति व्यक्ती गहू 3 किलो व तांदूळ 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे.

ज्या एपीएल (केसरी शिधापत्रिका) धारकांना सवलतीच्या दराने धान्य वाटप होणार, त्या शिधापत्रिका धारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसले, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना विहित केलेल्या दराने व परिमाणात धान्य देण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धान्य वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या