Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगररेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ

रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ

जिल्ह्यात मे महिन्यासाठी 1555 मेट्रिक टन तांदूळ

टिळकनगर (वार्ताहर)- प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबियांना मे व जून महिन्यात मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. या करता नगर जिल्ह्याला 1555 मेट्रिक टन तांदूळ प्राप्त होणार आहे. लवकरच मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

- Advertisement -

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये, याकरता अन्नपूर्णा योजना व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्यासह पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत पॅकेजची घोषणा केली. या योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबियांनाही मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून तालुकास्तरावर तहसीलदार यांच्यामार्फत रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबियांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने संपूर्ण माहिती गुरुवारपर्यंत संकलित होईल व किती कुटूंबियांना याचा लाभ होईल ते कळेल व त्यानंतर जिल्ह्यात तांदूळ वाटप सुरू करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी सांगितले.

आतापर्यंत जिल्ह्यातील कार्डधारकांनी विविध योजनेंतर्गत केलेली धान्य उचल

अंत्योदय व प्राधान्य कार्ड धारकांनी लाभ घेतलेली संख्या- 6,25, 009, गहू 9129. 87 मेट्रिक टन, तांदूळ 5408.66 मेट्रिक टन, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत कार्ड धारकांनी लाभ घेतलेली संख्या-4,46,373 तांदूळ- 10154. 52 मेट्रिक टन, एपीएल कार्ड धारकांनी लाभ घेतलेली संख्या-1,72,751 गहू- 2211.24 मेट्रिक टन, तांदुळ- 1479.98 मेट्रिक टन.

यांना मिळेल लाभ
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्याप पर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेले व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेले सामजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर, प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिका धारक, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधापत्रिका धारक यातून पूर्णपणे वगळण्यात येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या