Wednesday, April 24, 2024
Homeनगरराशीन येथील एकाच कुटुंबातील तिघांना करोनाची बाधा

राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघांना करोनाची बाधा

तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या झाली सहा

कर्जत (वार्ताहर)- तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली आहे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे आशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यातील राशीन येथील पुणे येथून पत्नीस भेटून आलेल्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाने तात्काळ त्याच्या कुटुंबातील चार जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी घेऊन गेले होते ते या चौघांचा अहवाल प्राप्त झाला असून यामधील त्या व्यक्तीचे वडील व मुलगी हे दोघे कोरो ना बाधित आढळून आले आहेत या यामुळे राशील परिसरात व तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कर्जत तालुक्यामधील राशीन येथे कोरो ना चा पहिला रुग्ण आढळून आला ती महिला मुंबई येथून आलेली होती या वृद्ध महिलेचे यामध्ये निधन देखील झाले होते यानंतर त्याच कुटुंबातील सहा वर्षाच्या मुलीला बाधा झाली होती त्यानंतर तीन दिवसांनी तालुक्यातील सिद्धटेक येथे हे मुंबई येथून आलेल्या व्यक्तीस कोरोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले यानंतर चार दिवस तालुक्यामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही यामुळे हळूहळू जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर होते.

मात्र राशीन येथील एक व्यक्ती ती पुणे येथे आपल्या पत्नीस भेटण्यासाठी गेला होता तेथून परत आल्यावर त्याला त्रास होऊ लागल्यामुळे प्रथम राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले त्याची लक्षणे पाहूनच स्थानिक वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तात्काळ नगर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले यानंतर त्याचा अहवाल काल सायंकाळी पॉझिटिव येताच तो संपूर्ण परिसर प्रशासनाने व पोलीस विभागाने केला व त्याच्या कुटुंबातील चार जणांना तात्काळ नगर येथे हलविण्यात आले यामधील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामुळे आता स्थानिक नागरिकांना देखील कोरो ना बाधित आढळून आले आहेत.

राशीन शहर संपूर्ण सील करण्याची आवश्यकता
कर्जत तालुक्यातील राशीन शहरामध्ये ते तब्बल पाच कोरोना चे रुग्ण आढळून आले आहेत या पार्श्वभूमीवर आता हे शहर पूर्णपणे सील करण्याची गरज आहे कारण राशी परिसरातून आजही नागरिक मोठ्या संख्येने तालुक्यात इतरत्र फिरताना दिसून येतात यामुळे तालुक्यात इतरत्र देखील याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे सर्व पाहून हे शहर आता पूर्णपणे सील करून शहरामध्ये कोणत्याही नागरिकास बाहेर येण्यास मज्जाव करण्याची गरज आहे ते तसे झाले तरच ही साखळी तोडण्यात प्रशासनाला लवकर यश मिळेल.

साखळी तोडण्याचे प्रशासनाला आव्हान
करोना बाधित आढळून आलेले रुग्ण हे स्थानिक आहेत यांच्या संपर्कात अनेक जण आलेले आहेत यामुळे कोरोना याची बाधा अनेकांना होऊ शकते या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनाला स्वीकारावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या