Type to search

Featured मुख्य बातम्या हिट-चाट

रानू मंडलने केला मेकओव्हर, सोशल मीडियावर होताय ट्रोल

Share

मुंबई:

गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडिया ट्रेंड असणारया रानू मंडल पुन्हा एकदा नवीन गोष्टीमुळे ट्रेंड होत आहेत. सध्याला सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती रानू मंडल यांच्या एका फोटोची. या फोटोमध्ये रानू मंडल यांनी अति मेकअप केला असल्याचे दिसत आहे.

रानू मंडल यांचा व्हायरल झालेला फोटो एका कार्यक्रमतील आहे. या कार्यक्रमात त्यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला आहे. तसेच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमझध्ये रानू रॅम्पवर वॉक करताना दिसत आहेत.

रॅम्प वॉक करताना अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चित्रपटातील ‘फॅशन का है ये जलवा’ हे गाणे सुरु असल्याचे पाहायला मिळते. मात्र रानू यांचा हा लूक चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी रानू यांच्यावर विविध मीम्स तयार करत त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!