Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डीत साध्या पध्दतीत रामनवमी उत्सव

Share
शिर्डीत साध्या पध्दतीत रामनवमी उत्सव Latest News Ramnavmi Program Simple Celibration Shirdi

राहता – शिर्डी साई मंदिरात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सध्या कोरोनाच सावट असल्याने संपुर्ण देशात लॉकडाऊन आहे. देशभरातील सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. शिर्डी साई मंदिरही 17 मार्च रोजी बंद करण्यात आल आहे. त्यामुळे यावर्षीचा रामनवमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजके अधिकारी , पुजारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज रामनवमी उत्सवाला सुरूवात झाली. शिर्डी साई मंदिरात तिन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो. आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो , विणा आणि पोथीची मिरवणुक काढण्यात आली. साई मंदिरातुन गुरूस्थान आणि त्यानंतर द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणुक काढल्यानंतर साईसतचरित्राचा पहिला अध्याय वाचुन उत्सवाला सुरूवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे , उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे , मंदिर सुरक्षा प्रमुख मधुकर गंगावणे यांच्यासह मोजके कर्मचारी उपस्थित होते. रामनवमी उत्सवासाठी देशभरातुन येणाऱ्या पायी पालख्यांना अगोदरच मनाई करण्यात आली होती तर गावचा यात्रा उत्सवही अगोदरच रद्द करण्यात आला होता. त्यानंतर साई मंदिरात फक्त धार्मिक विधी पार पडत असुन रामनवमीला मंदिरातुन निघणारी साईपालखी देखील रद्द करण्यात आलीय. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या रामनवमी उत्सवाच्या इतिहासात प्रथमच साईबाबांना कावडीत आणलेल्या गंगाजलाने अभिषेक घालण्यात आलेला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!