Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांकडून रमजान ईदच्या शुभेच्छा; ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन !

मुख्यमंत्र्यांकडून रमजान ईदच्या शुभेच्छा; ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन !

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. ते बोलतांना म्हणाले, सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ते बोलताना म्हणाले, गेल्या काही दिवसात करोना रुग्ण वाढले, करोनासोबत जगायला शिका, शिंकताना काळजी घ्या. मार्च – एप्रिलपासून करोना संकट सुरु झाले आहे. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण, ४७ हजार हा एकूण आकडा, जवळपास १३ हजार कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार, मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी गेले आहे. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील.

- Advertisement -

तसेच राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या. सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास ७ हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध राहतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच विरोधकांना देखील त्यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्व वर्गासाठी मदत. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के लोकांना मदत, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली आहे.

राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या, त्याने सहा ते सात लाख मजूर गावी, ८५ कोटी रुपये खर्च.
तीन लाख ८० हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, ७५ कोटी रुपये खर्च पुढच्या १५ दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो, ५० हजार उद्योग सुरु, सहा लाख कामगार रुजू झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या